KL Rahul : आयपीएलच्या २६ व्या सामन्यात राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) आणि लखनौ सुपर जायंट्स आमनेसामने आहेत. नाणेफेक जिंकून राजस्थानने लखनौला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले आहे. राजस्थानसाठी ट्रेंट बोल्टने (Trent Boult) पहिली ओव्हर केली. केएल राहुल (KL Rahul) मेडन ओव्हर खेळला. यासह आयपीएलमध्ये राहुलच्या नावावर एक लाजिरवाणा विक्रम नोंदवला गेला. यावरून चाहत्यांनी त्याला प्रचंड ट्रोल केले.
2014 पासून आयपीएलच्या इतिहासात एकूण 27 मेडन ओव्हर टाकण्यात आल्या आहेत. यापैकी केएल राहुलने सर्वाधिक अकरा वेळा मेडन ओव्हर्स खेळल्या आहेत. बुधवारी राजस्थानविरुद्ध पहिली ओव्हरही एकही रन न देता गेली. ट्रेंट बोल्टने पहिल्याच ओव्हरमध्ये अप्रतिम गोलंदाजी केली. या ओव्हरमध्ये एकही रन काढता आल्याने नेटीझन्सने राहुलला सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल केले.
पहिली ओव्हर मेडन खेळल्यामुळे चाहत्यांनी केएल राहुलला प्रचंड ट्रोल केले. ट्विटरवर अनेक यूजर्सनी मीम्सच्या माध्यमातून राहुलच्या परफॉर्मन्सला ट्रोल केले. एका यूजरने लिहिले की, घाबरू नका, जिम करू नका, हवे तेव्हा मेडन ओव्हर खेळा. या सामन्यात केएल राहुलला तीन वेळा जीवदान मिळाले. त्याचा झेल दोनदा सोडला गेला. सोबतच एकदा धावबाद होता होता वाचला.
ट्रेंट बोल्टने आयपीएल 2023 मध्ये अप्रतिम गोलंदाजी केली आहे. पहिले ओव्हर टाकल्यानंतर ट्रेंट बोल्टने आतापर्यंत 5 ओव्हर्समध्ये 13 धावा दिल्या आहेत. त्याचबरोबर त्याने 5 विकेट्स घेतल्या आहेत. या काळात त्याचा इकॉनॉमी रेट 2.6 होता. या दरम्यान 26 चेंडूत एकही रन काढता आला नाही.