KKR vs RCB : कोलकाता नाइट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (KKR vs RCB) यांच्यात IPL 2023 चा नववा सामना ईडन गार्डन्सवर खेळला गेला. या सामन्यात केकेआरने बंगळुरू संघाचा 81 धावांनी दारूण पराभव केला. आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
गुरबाज आणि शार्दुल ठाकूरच्या अर्धशतकांमुळे केकेआरने 204 धावा केल्या. प्रथम फलंदाजी करताना केकेआरची सुरुवात खराब झाली. डेव्हिड विलीने एकाच ओव्हरमध्ये व्यंकटेश आणि मनदीप सिंगला बाद करून दोन मोठे धक्के दिले. एका टप्प्यावर कोलकाताने 89 धावांवर 5 विकेट गमावल्या होत्या. आंद्रे रसेल शून्यावर बाद झाला.
यानंतर रिंकू सिंग आणि शार्दुलने डाव पुढे नेला. शार्दुलने वेगवान फलंदाजी करत टी-20 कारकिर्दीतील पहिले अर्धशतक केले. शार्दुलने 29 चेंडूत 68 धावा केल्या. त्याचवेळी रिंकू सिंगने 33 चेंडूत 46 धावांची खेळी केली. दोघांमध्ये सहाव्या विकेटसाठी 103 धावांची भागीदारी झाली. शेवटच्या ओव्हरमध्ये उमेश यादवने चौकार मारून संघाची धावसंख्या दोनशेच्या पुढे नेली. आरसीबीला विजयासाठी 205 धावांची गरज होती.
- Monsoon Updates: मान्सूनची होणार एंट्री? ‘या’ राज्यात 7 जूनपर्यंत मुसळधार पाऊस
- Gold Price Today: सोन्याच्या दरात घसरण! खरेदीसाठी उत्तम संधी, जाणुन घ्या नवीन दर
- RBI ची मोठी कारवाई! ‘या’ बँकेला ठोठावला कोटींचा दंड; ‘हे’ आहे कारण
- Asia Cup 2023 : ‘त्या’ प्रकरणात पाकिस्तानने दिली श्रीलंकेला धमकी, वाचा सविस्तर
- Airtel Recharge Plan: जबरदस्त! फक्त 155 रुपयांमध्ये एअरटेल देत आहे अनलिमिटेड कॉलिंगसह ‘ही’ भन्नाट सुविधा
लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबीने दमदार सुरुवात केली होती. कोहली आणि डुप्लेसिसने पहिल्या चार ओव्हर्समध्ये धावसंख्या ४० च्या पुढे नेली. यानंतर मात्र सुनिल नारायणने पहिला धक्का दिला. त्यानंतर चक्रवर्तीने डुप्लेसिसला बाद करून दुसरा मोठा धक्का दिला. आरसीबीसाठी रहस्यमय गोलंदाज ठरलेल्या चक्रवर्तीने हर्षल पटेल, मॅक्सवेल आणि आकाश दीप यांना बाद केले.
आरसीबीचे पाच फलंदाज दुहेरी आकडा पार करू शकले. 6 फलंदाजांनी संघाची निराशा केली. आरसीबी 17.4 षटकात 123 धावा करत ऑलआऊट झाला आणि संघाला नामुष्कीजनक पराभव स्वीकारावा लागला.
चक्रवर्तीने आरसीबीची शेवटची विकेट घेतली. 205 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबीला केवळ 123 धावाच करता आल्या. आरसीबीसाठी कर्णधार डू प्लेसिसने सर्वाधिक २३ धावा केल्या. त्याचवेळी केकेआरकडून वरुण चक्रवर्तीने चार आणि सुयशने तीन विकेट घेतल्या.