IPL 2023 : गुवाहाटी येथे खेळल्या गेलेल्या IPL 2023 च्या आठव्या सामन्यात राजस्थान रॉयल्सला पंजाब किंग्जविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले. या सामन्यातील पराभवासोबतच राजस्थान रॉयल्सचा दिग्गज फलंदाज जोस बटलर (Jos Buttler) जखमी झाला.
सामन्यादरम्यान क्षेत्ररक्षण करताना त्याच्या डाव्या हाताच्या करंगळीला दुखापत झाली होती. ही दुखापत इतकी गंभीर होती की बटलरच्या बोटाला अनेक टाकेही घालण्यात आले. अशा परिस्थितीत राजस्थान रॉयल्स संघ त्याच्या अहवालाची प्रतीक्षा करत आहे. दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या आगामी सामन्यात खेळू शकेल की नाही याबाबत अनिश्चितता कायम आहे. त्यामुळे राजस्थानच्या अडचणी वाढल्या आहेत.
पंजाब किंग्जविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा स्टार फलंदाज जोस बटलर जखमी झाला होता. जोस बटलरच्या जागी रविचंद्रन अश्विनला सुरुवातीला पाठवण्यात आले. 198 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सची सुरुवात चांगली झाली नाही. दुसऱ्या ओव्हरमध्येच यशस्वी जैस्वालच्या रूपाने मोठा धक्का बसला. यानंतर जोस बटलर फलंदाजीला आला आणि त्याने 11 चेंडूत एक चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 19 धावा केल्या, पण मोठी खेळी खेळण्यात तो अपयशी ठरला.
8 एप्रिल रोजी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध खेळल्या जाणार्या सामन्यापूर्वी जोस बटलरच्या सहभागावर शंका आहे. सध्या राजस्थान रॉयल्स त्याच्या वैद्यकीय अहवालाची वाट पाहत आहे जेणेकरून पुढील सामन्यात बटलरला खेळणे कठीण आहे की नाही हे समजू शकेल.
पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात जोस बटलरने दोन अप्रतिम झेल घेतले होते. त्यापैकी एक झेल पकडताना त्याच्या बोटाला दुखापत झाली होती आणि त्यानंतर त्याच्या बोटाला टाके घालण्यात आले होते. अशा परिस्थितीत जोस बटलर पूर्णपणे तंदुरुस्त नसेल तर त्याच्या अनुपस्थितीमुळे राजस्थान रॉयल्स संघ कमकुवत होईल.
दुसरा कोण
दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यासाठी जोस बटलर उपलब्ध नसल्यास, त्याच्या जागी 24 वर्षीय दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू डेनोवन फरेरा याला संधी मिळू शकते. SA20 लीगमध्ये फरेराने 40 चेंडूत 82 धावांची तुफानी खेळी केली होती, अशा परिस्थितीत संघ त्याला प्लेइंग-11 मध्ये खेळण्याची संधी देऊ शकतो.