IPL 2023 Live Streaming : आयपीएल (IPL) हे एक व्यासपीठ आहे जिथे युवा खेळाडूंना त्यांचे कौशल्य सिद्ध करण्याची संधी मिळते. इंडियन प्रीमियर लीगचा (IPL 2023 Live Streaming) 16 वा हंगाम 31 मार्चपासून सुरू होत आहे. जिथे पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात होणार आहे. गुजरात टायटन्सने हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वात त्यांच्या पदार्पणाच्या हंगामात आयपीएल 2022 चे विजेतेपद जिंकले. त्याचवेळी बीसीसीआयने आयपीएल स्पर्धेच्या अंतिम सामन्याचे वेळापत्रक जाहीर केले आहे.
IPL 2023 चा पहिला सामना 31 मार्च रोजी गुजरात टायटन्स (GT) आणि चेन्नई सुपर किंग्स (CSK) यांच्यात होणार आहे. IPL 2023 चे सर्व लाइव्ह सामने Jio सिनेमावर पाहता येतील. या स्पर्धेचे थेट प्रसारण Jio Cinema वर एकूण 14 भाषांमध्ये होईल. स्पर्धेतील अंतिम सामना 28 मे 2023 रोजी होणार आहे. नाणेफेकीच्या वेळी प्लेइंग 11 सोबत संघांना त्यांच्या 4 पर्यायी खेळाडूंची नावे देखील द्यावी लागतील.
- IND vs PAK : क्रिकेट चाहत्यांची घोर निराशा; पाकिस्तान संघाने घेतला ‘हा’ निर्णय
- PM-SHRI Scheme : शाळा होणार मॉडेल; ‘त्यासाठी’ मोदी सरकारने 9 हजार शाळा केल्या सिलेक्ट
- PF Balance : कंपनी तुमच्या खात्यात पीएफचे पैसे टाकते का ? ; ‘या’ सोप्या पद्धतींनी मिळवा माहिती
- Railway Fuel Pump : कुठे असतात रेल्वेचे पेट्रोल पंप ?, कसे भरतात इंधन ?, किती मिळतो मायलेज ?; वाचा..
- TV Viewing Distance : टीव्ही किती अंतरावरून पहावा ? ; तुम्ही ‘ही’ चूक तर करत नाही ना, जाणून घ्या..
या 4 पर्यायांपैकी फक्त एक प्रभाव खेळाडू म्हणून वापरला जाईल. प्रभावशाली खेळाडूंना सामन्यातील डावाच्या 14 व्या ओव्हरपर्यंतच मैदानावर पाठवता येईल.फलंदाजी करणाऱ्या फलंदाजाऐवजी किंवा गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजाऐवजी प्रभावशाली खेळाडू मैदानावर जाऊ शकतो. 14 व्या ओव्हरनंतर कोणताही संघ या नियमाचा फायदा घेऊ शकत नाही.
दरम्यान, यंदा कोरोनाचे संकट नाही. त्यामुळे कोणतेही निर्बंध नाहीत. स्पर्धांची तयारी जोरात सुरू आहे. या निमित्ताने कोट्यावधी रुपयांची उलाढाल होत आहे.