IPL 2023: IPL च्या इतिहासात तब्बल दहा वेळा फायनल मध्ये एंट्री करुन CSK ने एक इतिहास रचला आहे.
IPL 2023 च्या पाहिल्या क्वालिफायर सामन्यात गुजरात टायटन्सवर 15 धावांनी मात करत CSK फायनलमध्ये पोहोचली आहे.
तर दुसरीकडे CSK चा कर्णधार महेंद्रसिंग धोनी पुढील वर्षी IPL खेळणार की नाही याबाबत चर्चांना उधाण आला आहे.
आयपीएल क्वालिफायरच्या पहिल्या सामन्यात गुजरात टायटन्सवर 15 धावांनी विजय मिळवल्यानंतर पुरस्कार सोहळ्यात हर्षा भोगलेने धोनीला विचारले, तू इथे पुन्हा खेळशील का (चेन्नई)
IPL 2023 नंतर धोनी निवृत्त होणार का?
महेंद्रसिंग धोनी म्हणाला, ‘मला माहित नाही, माझ्याकडे निर्णय घेण्यासाठी आठ-नऊ महिने आहेत. माझ्याकडे विचार करण्यासाठी पुरेसा वेळ आहे, त्यामुळे मला आत्ताच याबद्दल विचार करून डोकेदुखी करायची नाही.” अर्थात, मला फक्त चेन्नईसोबतच राहायचे आहे.” महेंद्रसिंग धोनी म्हणाला, “पुढील वर्षी डिसेंबर मध्ये आयपीएल लिलाव आहे. त्यावेळी विचार करेन. मी या वर्षी जानेवारीपासून घराबाहेर आहे, मार्चपासून सराव करतोय, नंतर बघेन.
ऋतुराज गायकवाडच्या अर्धशतकी खेळीनंतर चेन्नई सुपर किंग्जने गुजरात टायटन्सचा 15 धावांनी पराभव करत पाचव्यांदा विजेतेपदाच्या दिशेने पाऊल टाकले. गायकवाडच्या 44 चेंडूत 60 धावांच्या खेळीच्या जोरावर सात गडी बाद 172 धावा केल्यानंतर गुजरात टायटन्सचा डाव शेवटच्या चेंडूवर 157 धावांत आटोपला आणि 10व्यांदा अंतिम फेरीचे तिकीट कापले. या स्पर्धेत गुजरातचा संघ प्रथमच ऑलआऊट झाला आहे.
गुजरात संघ आता दुसऱ्या क्वालिफायरमध्ये बुधवारी लखनौ सुपरजायंट्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळल्या जाणाऱ्या एलिमिनेटर सामन्यातील विजेत्याशी भिडणार आहे. गुजरात टायटन्सकडून शुभमन गिलने सर्वाधिक 42 धावांचे योगदान दिले. राशिद खानने शेवटच्या षटकात 16 चेंडूत तीन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 30 धावांची खेळी करत सामन्याचा थरार वाढवला, पण तो संघासाठी अपुरा ठरला.