King Kohli Records IPL 2023: IPL 31 मार्चपासून सुरू होत आहे. गुजरातच्या नजरा दुसऱ्या ट्रॉफीवर असताना चेन्नईला विजयी मार्गावर परतायचे आहे. यावेळी हार्दिकच्या (Hardik Pandya) संघाने आयपीएल 2023 चा हंगाम जिंकल्यास सलग दुसऱ्यांदा आयपीएलचे जेतेपद पटकावणारा चेन्नई आणि मुंबईनंतरचा हा तिसरा संघ ठरेल.
या हंगामात (IPL 2023) हार्दिक आणि त्याचा संघ काय कमाल दाखविणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. दुसरीकडे कोहलीबद्दल (Virat Kohli) बोलायचे झाले तर या सत्रात हा खेळाडू अनेक विक्रम आपल्या नावावर करू शकतो.
सर्वाधिक आयपीएल शतकांचा विक्रम
आयपीएलमधील सर्वाधिक शतके ख्रिस गेलच्या (Chris Gayle) नावावर आहेत. गेलने आयपीएलमध्ये 6 शतके केली आहेत. दुसरीकडे, विराटबद्दल बोलायचे तर तो पाच शतकांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. अशा स्थितीत शतक झळकावताच तो गेलची बरोबरी करेल.
- Monsoon Updates: मान्सूनची होणार एंट्री? ‘या’ राज्यात 7 जूनपर्यंत मुसळधार पाऊस
- Gold Price Today: सोन्याच्या दरात घसरण! खरेदीसाठी उत्तम संधी, जाणुन घ्या नवीन दर
- RBI ची मोठी कारवाई! ‘या’ बँकेला ठोठावला कोटींचा दंड; ‘हे’ आहे कारण
- Asia Cup 2023 : ‘त्या’ प्रकरणात पाकिस्तानने दिली श्रीलंकेला धमकी, वाचा सविस्तर
- Airtel Recharge Plan: जबरदस्त! फक्त 155 रुपयांमध्ये एअरटेल देत आहे अनलिमिटेड कॉलिंगसह ‘ही’ भन्नाट सुविधा
सात हजार धावांचा टप्पा
यावेळी आयपीएलमध्ये कोहलीच्या नावावर सर्वाधिक धावा आहेत. कोहलीने 224 सामन्यात 6 हजार 624 धावा केल्या आहेत. 7000 धावांच्या जादुई आकड्यापासून फक्त 376 धावा दूर आहेत. आयपीएल 2023 मध्ये हा पराक्रम करून कोहली 7000 क्लबमध्ये प्रवेश करणारा आयपीएल इतिहासातील पहिला खेळाडू ठरणार आहे.
कॅच शतक करू शकतो
कोहली या आयपीएलमध्ये त्याच्या कॅच घेण्याचेही शतक करू शकतो. कोहलीच्या नावावर 93 कॅच आहेत. म्हणजेच त्याने आतापर्यंत 93 कॅच घेतले आहेत. आणखी 7 कॅच पकडल्यास शतक पूर्ण होईल. कोहली हा रैना (109) आणि पोलार्ड (103) यांच्यानंतर 100 कॅच घेणारा तिसरा खेळाडू ठरेल.