मुंबई – नुकताच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) अहमदाबाद संघाला क्लीन चिट दिली आहे. त्यामूळे लवकरच आयपीएल मध्ये लखनऊ सह अहमदाबाद देखील खेळताना दिसणार आहे. दोन्ही संघ 31 जानेवारी पर्यंत लिलाव पूलमध्ये समाविष्ट असलेल्या खेळाडूंमधून प्रत्येकी तीन खेळाडूंचा समावेश आपल्या संघात करुन घेणार आहे.
अहमदाबादमध्ये या खेळाडूंचा होऊ शकतो समावेश
समोर आलेल्या माहितीनुसार अहमदाबाद संघाने आपल्या खेळाडूंचे नाव जवळपास निश्चित केले आहे.मुंबई इंडियन्सच्या दोन माजी खेळाडूंना अहमदाबाद संघात सामील करू शकते. हार्दिक पांड्या आणि इशान किशन अशी या खेळाडूंची नावे आहेत. तर हार्दिकला संघाचा कर्णधार बनवले जाऊ शकते. याबाबतचा निर्णयही जवळपास घेण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे.
हार्दिकचा संघात समावेश करण्यामागचे मोठे कारण म्हणजे तो गुजरातचा आहे. याशिवाय अहमदाबादचा संघ अफगाणिस्तानचा फिरकी गोलंदाज राशिद खानलाही संघात सामील करू शकतो. राशिदने आयपीएलच्या 76 सामन्यात 6.33 च्या इकॉनॉमी रेटने 93 विकेट घेतल्या आहेत. मागच्या सीझनमध्ये तो सनरायझर्स हैदराबाद संघात होता.
आयपीएलच्या मागच्या सीझनमध्ये ईशान आणि हार्दिकला लक्षणीय कामगिरी करण्यात अपयश आले होते. ईशानने 61 आयपीएल सामन्यात 136.34 च्या स्ट्राईक रेटने 1 हजार 452 धावा केल्या आहेत. तर हार्दिकने 92 आयपीएल सामन्यांमध्ये 153.91 च्या स्ट्राइक रेटने 1 हजार 476 धावा केल्या आहेत. याशिवाय त्याच्या नावावर 42 विकेट्स आहेत.