मुंबई – आयपीएल 2022 (IPL Auction 2022) चा मेगा लिलाव बेंगळुरूमध्ये सुरू आहे. 10 बोली लावणाऱ्या फ्रँचायझींनी आतापर्यंत 26 खेळाडूंना खरेदी केले आहे. त्यापैकी आतापर्यंतचा सर्वात महागडा खेळाडू इशान किशन (Ishan Kishan) आहे, ज्याला मुंबईने 15.25 कोटींना विकत घेतले आहे. इशानवर बोली लावण्यासाठी मुंबई (Mumbai) आणि गुजरातदरम्यान (Gujarat) 10 मिनिटांची शर्यत होती.
या लिलावासह ईशान आयपीएलमधील दुसरा सर्वात महागडा भारतीय ठरला आहे. यापूर्वी युवराजला दिल्ली कॅपिटल्सने 16 कोटींना विकत घेतले होते. इशानने त्याचा गुरू महेंद्रसिंग धोनीलाही मागे टाकले, ज्याला चेन्नईने 12 कोटींमध्ये कायम ठेवले आहे.
या लिलावात इशान व्यतिरिक्त श्रेयस अय्यर, हर्षल पटेल आणि श्रीलंकेचा हसरंगा 10 कोटींहून अधिक रुपयांना विकला गेला. 10 कोटींहून अधिक किमतीत विकला जाणारा हसरंगा हा पहिला परदेशी आहे.
Kharediwala घेऊन आलोय आलेय इंडियन ईकॉमर्स..!
मोठी नावे विकली नाही
बांगलादेशचा माजी कर्णधार शकीब अल हसनही पहिल्या फेरीत विकला गेला नाही. त्याची मूळ किंमत 2 कोटी रुपये होती. मिस्टर आयपीएल म्हणून प्रसिद्ध असलेला सुरेश रैना विकला गेला नाही. त्याची मूळ किंमत 2 कोटी रुपये होती. आयपीएल 2021 च्या मधल्या हंगामात चेन्नईने त्याला वगळले होते. आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सचा कर्णधार असलेला स्टीव्ह स्मिथही विकला गेला नाही. त्याची मूळ किंमतही 2 कोटी रुपये होती. गेल्या वर्षी स्मिथ दिल्ली कॅपिटल्स संघाचा भाग होता.