मुंबई – अहमदाबाद फ्रँचायझी (Ahmedabad Franchise) गॅरी कर्स्टन (Gary Kirsten) , आशिष नेहरा (Ashish Nehra) आणि विक्रम सोलंकी (Vikram Solanki) यांना पाठिंबा देण्यासाठी फिरकी प्रशिक्षकाची निवड करणार आहे. फ्रँचायझी माजी भारतीय फिरकीपटू आशिष कपूरला फिरकी प्रशिक्षक म्हणून नियुक्त करू शकते. फ्रँचायझीने भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याला कर्णधार म्हणून नियुक्त केले आहे. हार्दिक व्यतिरिक्त संघाने अफगाणिस्तानचा रशीद खान आणि भारताचा सलामीवीर शुभमन गिल यांचा ड्राफ्टद्वारे संघात समावेश केला आहे.
2011 मध्ये भारताला विश्वचषक जिंकून देणारे प्रशिक्षक गॅरी कर्स्टन हे संघाचे मार्गदर्शक आणि फलंदाजी प्रशिक्षक आहेत. त्याचबरोबर आशिष नेहरा हे मुख्य प्रशिक्षक आहेत. इंग्लंडच्या विक्रम सोलंकी यांची फ्रँचायझीने क्रिकेट संचालकपदी नियुक्ती केली आहे. नेहरा, सोलंकी आणि कर्स्टन यांनी यापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगलोरसाठी एकत्र काम केले आहे. आशिष कपूर सध्या फ्रँचायझी मालक सीव्हीसी कॅपिटलशी बोलणी करत आहेत आणि विक्रम सोलंकी यांच्या संपर्कात आहेत.
कोण आहे आशिष कपूर?
आशिष कपूरचा भारतासाठी चार कसोटी आणि 17 वनडे खेळला आहे. त्याने 10 डिसेंबर 1994 रोजी मोहाली येथे वेस्ट इंडिजविरुद्ध पहिली कसोटी खेळली होती. पहिला एकदिवसीय सामना 22 फेब्रुवारी 1995 रोजी ड्युनेडिन येथे ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळला गेला होता. तामिळनाडूचा आशिष 1996 च्या विश्वचषकात भारतीय संघाचा सदस्य होता. त्याने 8 डिसेंबर 1996 रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कानपूर येथे शेवटची कसोटी आणि 14 डिसेंबर 2000 रोजी राजकोट येथे झिम्बाब्वेविरुद्ध शेवटची वनडे सामना खेळला आहे. (IPL 2022: India’s ‘this’ former cricketer to make entry in Ahmedabad squad, to play big role)