मुंबई – आयपीएल 2022 चा (IPL 2022) थरार शिगेला पोहोचला आहे, सर्व संघ एकमेकांविरुद्ध विजय मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण विजय त्याच संघाचा होत आहे, ज्याची कामगिरी इतर संघापेक्षा सरस आहे. आयपीएलच्या या हंगामात, चार वेळा चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) खेळ खूपच निराशाजनक झाला आहे, ज्यामुळे CSK गुणतालिकेत नवव्या स्थानावर आहे. IPL 2022 च्या मेगा लिलावात CSK ने दोन खेळाडूंवर मोठ्या प्रमाणात पैशांचा पाऊस पाडला. मात्र दोन्ही खेळाडू संघाच्या अपेक्षा पूर्ण करू शकले नाहीत.
आयपीएल 2022 च्या मेगा लिलावात, CSK ने 4 खेळाडूंना कायम ठेवले होते, तर मेगा लिलावात 21 खेळाडूंना विकत घेऊन एक संघ बनवला होता. IPL 2022 साठी CSK ने राखून ठेवलेल्या चार खेळाडूंपैकी, पहिला रिटेनशन टीम रवींद्र जडेजाला (Ravindra Jadeja) देण्यात आला.
इतकेच नाही तर पहिल्या आठ सामन्यांमध्ये सीएसकेने संघाची कमान रवींद्र जडेजाकडे सोपवली होती. पण रवींद्र जडेजा ना योग्य कर्णधार करू शकला ना चांगला खेळ दाखवू शकला. आयपीएल 2022 साठी सीएसकेने रवींद्र जडेजाला 16 कोटी रुपयांमध्ये पहिले रिटेनशन दिले होते. रवींद्र जडेजाच्या सततच्या निराशाजनक कामगिरीबद्दल सीएसकेला पश्चाताप होईल.
आपल्या ‘तिच्या’ हातांची काळजी आहे ना..? मग https://bit.ly/34DPYzN यावर क्लिक करून पीजन चॉपर पहा अन आवडला तर भेट द्या किंवा खरेदी करा
CSK ने IPL 2022 च्या मेगा ऑक्शनमध्ये दीपक चहरचा त्यांच्या संघात समावेश केला. CSK ने आपल्या संघात सर्वाधिक किंमत देऊन दीपक चहरला (Deepak chahar) आपल्या संघात समाविष्ट केले. सीएसकेने दीपक चहरला 14 कोटी रुपयांना खरेदी करून आपल्या संघात समाविष्ट केले होते. पण दीपक चहर दुखापतीमुळे लीगमधून बाहेर होता. IPL 2022 मध्ये CSK ला दीपक चहरची उणीव भासली आहे.