मुंबई – राजस्थान रॉयल्सचा (RR) वेगवान गोलंदाज नॅथन कुल्टर-नाईल (Nathan Coulter-Nile) आयपीएलच्या १५व्या (IPL 2022) हंगामातून बाहेर झाला आहे. कुल्टर नाईल दुखापतीमुळे लीगच्या 15 व्या मोसमातील उर्वरित सामने खेळू शकणार नाही. नाथनच्या बाहेर पडल्याने राजस्थान संघाला मोठा झटका बसला आहे. राजस्थानने या मोसमात आतापर्यंत तीनपैकी दोन सामने जिंकले आहेत. मात्र, राजस्थानने अद्याप कुल्टर नाईलच्या बदलीची घोषणा केलेली नाही.

आयपीएल मेगा ऑक्शन 2022 मध्ये राजस्थानने कुल्टर नाईलला 2 कोटी रुपयांना विकत घेतले होते. सनरायझर्स हैदराबादविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात वेगवान गोलंदाज कुल्टर-नाईलला ही दुखापत झाली. या सामन्यात राजस्थानने हैदराबादचा 61 धावांनी पराभव केला. या सामन्यात कुल्टर-नाईल खूप महागडा ठरला आणि त्याने 3 षटकात 48 धावा दिल्या.

आपल्या ‘तिच्या’ हातांची काळजी आहे ना..? मग https://bit.ly/34DPYzN यावर क्लिक करून पीजन चॉपर पहा अन आवडला तर भेट द्या किंवा खरेदी करा

मीडिया रिपोर्ट्सनुसार, नॅथन कुल्टर-नाईल हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे संपूर्ण हंगामातून बाहेर पडल्यानंतर कर्णधार संजू सॅमसनला मोठा धक्का बसला आहे. आता राजस्थान संघात नाईलच्या जागी कोणाचा समावेश होतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. राजस्थान संघ सध्या तीन सामन्यांत दोन विजय आणि एक पराभवासह गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे.

Share.

Leave A Reply

Exit mobile version