मुंबई : आयपीएलच्या मेगा ऑक्शनसाठी जोरदार तयारी सुरू आहे. यावेळी लिलावात अनेक खेळाडू सहभागी होणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, तब्बल 1214 खेळाडूंनी नोंदणी केली आहे. यामध्ये जवळपास 896 भारतीय खेळाडू आहेत. बाकीचे विदेशी खेळाडू आहेत. आयपीएल लिलाव पुढील महिन्यात होणार आहेत. मात्र, बीसीसीआय आतापासूनच नियोजन करत आहे.
ऑस्ट्रेलियन संघाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर, जो T20 विश्वचषक 2021 मध्ये मालिकावीर ठरला होता आणि त्याचा सहकारी आणि अंतिम सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू, मिचेल मार्श या 49 खेळाडूंमध्ये आहेत ज्यांनी त्यांची मूळ किंमत 2 कोटी रुपये ठेवली आहे. IPL 2022 मेगा लिलाव पुढील महिन्यात 12 आणि 13 फेब्रुवारी रोजी बंगळुरूमध्ये होणार आहेत. यावेळी 1214 खेळाडूंनी लिलावासाठी नोंदणी केली आहे.
यामध्ये 896 भारतीय आणि 318 परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. यावेळी 8 ऐवजी 10 संघ राहणार आहेत. या संघांनी लिलावाआधीच आपल्यासोबत 33 खेळाडू जोडले आहेत. मिचेल स्टार्क, सॅम कुरन, बेन स्टोक्स, ख्रिस गेल, जोफ्रा आर्चर आणि ख्रिस वोक्स हे खेळाडू लिलावाच्या सुरुवातीच्या यादीतून मात्र गायब आहेत.
IPL ने ट्विटरवर दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की यावेळी IPL 2022 मेगा लिलावात सुमारे 1214 खेळाडूंवर बोली लावली जाणार आहे. यामध्ये 270 कॅप्ड, 903 अनकॅप्ड आणि 41 सहयोगी देशांतील खेळाडूंचा समावेश आहे. 1214 पैकी 49 खेळाडूंनी त्यांची मूळ किंमत 2 कोटी रुपये ठेवली आहे. या 49 खेळाडूंपैकी 17 भारतीय आणि 32 विदेशी खेळाडू आहेत. भारतीयांमध्ये आर अश्विन, श्रेयस अय्यर, शिखर धवन, इशान किशन, सुरेश रैना, तर परदेशी खेळाडूंमध्ये पॅट कमिन्स, अॅडम झाम्पा, स्टीव्हन स्मिथ, मार्क वुड, ट्रेंट बोल्ट, फाफ डू प्लेसिस, कागिसो रबाडा यांचा समावेश आहे. यावेळी आयपीएल 2022 साठी संघांची रक्कम 85 कोटींवरून 90 कोटी रुपये करण्यात आली आहे.
आयपीएलने पुढे सांगितले, की प्रत्येक फ्रँचायझीच्या संघात जास्तीत जास्त 25 खेळाडू असतील आणि ते लिलावात 217 खेळाडू खरेदी करतील. त्यापैकी 70 विदेशी खेळाडू असू शकतात. याशिवाय रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा माजी सलामीवीर देवदत्त पडिक्कल, 2012 मध्ये सर्वाधिक विकेट घेणारा हर्षल पटेल आणि वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू ओडियन स्मिथ यांनीही त्यांची मूळ किंमत 2 कोटी रुपये ठेवली आहे. पडिक्कलने गेल्या वर्षी श्रीलंकेत भारताकडून पदार्पण केले होते. 2020 मध्ये त्याला 20 लाख रुपयांना खरेदी करण्यात आले. त्याच्या नावावर एक आयपीएल शतक आहे.
आयपीएल 2022 च्या लिलावात 318 परदेशी खेळाडूंपैकी ऑस्ट्रेलियाचे सर्वाधिक 59 खेळाडू आहेत. याशिवाय दक्षिण आफ्रिकेचे 48, वेस्ट इंडिजचे 41, श्रीलंकेचे 41, अफगाणिस्तानचे 20, बांगलादेशचे 19, नेपाळचे 15, अमेरिकेचे 14, नामिबियाचे 5, झिम्बाब्वेचे 2 खेळाडू आहेत.
IPL 2022: साडे 12 कोटी घेणाऱ्या ‘या’ स्टार खेळाडूंने मेगा लिलावापूर्वी IPL मधून घेतली माघार