iPhone SE 4 : बाजारात लवकरच येणार स्वस्त iPhone, आकर्षक लुकसह मिळतील जबरदस्त फीचर्स

iPhone SE 4 : Apple ही जगातील सर्वात आघाडीची कंपनी आहे. कंपनी सतत आपले विविध उत्पादने लाँच करत असते. कंपनी आपल्या फोनमध्ये अनेक जबरदस्त फीचर्स उपलब्ध करून देते. कंपनीच्या फोनची किंमत जरी जास्त असली तरी अनेकजण त्याला खरेदी करतात. अशातच आता बाजारात कंपनीचा iPhone SE 4 फोन लाँच होणार आहे.

TrueDepth कॅमेरा सिस्टम

सर्वात महत्त्वाचे म्हणजे कंपनी या नॉचमध्ये TrueDepth कॅमेरा सिस्टम देणार असून SE मालिकेतील हा पहिला फोन असणार आहे, जो फेस आयडी प्रमाणीकरणासह येईल. फोनचे बेझल देखील खूपच स्लिम असून आणखी एक मोठा बदल iPhone SE 4 मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. या फोनमध्ये कंपनी लाइटनिंग पोर्टऐवजी USB-C पोर्ट देत आहे. तर फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये सिंगल कॅमेरा सेटअप पाहायला मिळेल. SE मालिकेचे पूर्वीचे प्रकार देखील सिंगल कॅमेरा सेटअपसह होते.

मिळेल ॲक्शन बटण

रिपोर्ट्सनुसार सांगायचे झाले तर, कंपनी या फोनमध्ये ॲक्शन बटण देऊ शकते. ही एक सानुकूल शॉर्टकट की असण्याची शक्यता आहे. या फोनचा आकार जवळपास iPhone 14 सारखा असेल. कंपनी पुढील वर्षी हा आयफोन लॉन्च करण्याची शक्यता आहे. किमतीचा विचार केला तर या फोनची किंमत iPhones पेक्षा खूपच कमी असण्याची शक्यता आहे.

असा विश्वास आहे की ऍपल स्वस्त स्मार्टफोन सेगमेंटमध्ये आपली पकड मजबूत करण्यासाठी अतिशय आकर्षक किंमतीसह लॉन्च करेल. याची खास गोष्ट म्हणजे कमी किंमत असूनही कंपनी या फोनमध्ये मोठा डिस्प्ले, फेस आयडी आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट सारखे फीचर्स उपलब्ध करून देत आहे. फोनच्या लॉन्च टाइमलाइनबाबत कंपनीकडून अजूनही कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

Leave a Comment