iPhone Offer : इतर स्मार्टफोनच्या तुलनेत आयफोनच्या किमती जास्त असतात. त्यामुळे अनेकांना इच्छा असूनही आयफोन खरेदी करता येत नाही. अशातच आता आयफोनप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. तुम्ही iPhone 15, iPhone 14, आणि iPhone 13 हे 13 हजारांपर्यंत खरेदी करू शकता.
आयफोन 13 ऑफर
तुम्हाला फ्लिपकार्ट सेलमध्ये iPhone 13 52,999 रुपयांना मिळेल. तसेच या फोनवर काही बँक ऑफर्स मिळत असून ज्याचा फायदा घेऊन तुम्ही तो खूप कमी किमतीत खरेदी करू शकता.
आयफोन 15 ऑफर
किमतीचा विचार केला तर iPhone चे 128GB स्टोरेज मॉडेल फ्लिपकार्ट सेलमध्ये 66,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत विक्री केली जात आहे. HDFC बँकेच्या क्रेडिट कार्डने फोन खरेदी करण्यावर 1,000 रुपयांची अतिरिक्त सवलत आहे, ज्यामुळे किंमत प्रभावीपणे 65,999 रुपये इतकी आहे. ज्यांच्याकडे ॲक्सिस बँकेचे क्रेडिट कार्ड आहेत त्यांना 2750 रुपयांची सवलत मिळते. ज्यामुळे प्रभावीपणे किंमत 64,249 रुपयांपर्यंत खाली येते.
आयफोन 15 भारतात 79,900 रुपयांना लॉन्च केला होता. हे दर्शविते की बँक ऑफर सोडून, फ्लिपकार्ट 12,901 रुपयांची सवलत देत आहे. ही एक मोठी संधी असून एक्सचेंज ऑफरचा फायदा घेऊन, ते आणखी कमी किमतीत खरेदी करता येते.
आयफोन 15 प्रो
तुम्हाला iPhone 15 Pro खरेदी करायचा असल्यास 128GB स्टोरेज मॉडेल फ्लिपकार्ट सेलमध्ये 1,27,990 रुपयांना विकला जात आहे. कंपनीने हा फोन 1,34,900 रुपयांच्या किमतीत लॉन्च केला आहे. फ्लिपकार्ट सेलमध्ये फोन 6,910 रुपयांना मिळत आहे. तुम्हाला Axis Bank क्रेडिट कार्डसह 10% झटपट सवलत मिळेल. UPI द्वारे फोन खरेदी करण्यावर 750 रुपयांची सवलत मिळत आहे.
आयफोन 14 ऑफर
आयफोन 14 बद्दल बोलायचे झाले तर, हा फ्लिपकार्ट सेलमध्ये 57,999 रुपयांना खरेदी करता येईल. जर तुमच्याकडे Axis Bank क्रेडिट आणि Citi-ब्रँडेड क्रेडिट कार्ड आहेत त्यांना या फोनवर 1,000 रुपयांची अतिरिक्त सवलत मिळेल.