iPhone Offer : जर तुम्हाला सवलतीत आयफोन खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी एक शानदार ऑफर आहे. तुम्ही आता आयफोनचे सर्वात जास्त विक्री करणारे मॉडेल 22 हजारांच्या सवलतीत खरेदी करता येईल.
iPhone 13 ऑफर
iPhone 13 चे 128GB मॉडेल फ्लिपकार्टवर 59,900 रुपयांना सूचीबद्ध करण्यात आले आहे, पण ते केवळ 53,999 रुपयांमध्ये उपलब्ध असून 5,901 रुपयांची सवलत आहे. खरेदीदारांना SBI क्रेडिट कार्ड व्यवहारांवर 4,000 रुपयांची सवलत मिळेल.
ज्यामुळे फोनची प्रभावी किंमत 49,999 रुपये होईल. या फोनवर एकूण 9,901 रुपयांची बचत होईल. iPhone 13 A15 बायोनिक चिपने सुसज्ज असून ज्यात 6.1 इंचाचा OLED डिस्प्ले दिला आहे. यात 12-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आणि दोन 12MP रियर कॅमेरे आहेत.
iPhone 14 ऑफर
किमतीचा विचार केला तर iPhone 14 चे 128GB मॉडेल फ्लिपकार्टवर 69,900 रुपयांना सूचीबद्ध केले आहे, ते केवळ 58,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे, म्हणजेच 10,901 रुपयांची सवलत मिळेल. खरेदीदारांना HDFC क्रेडिट कार्ड व्यवहारांवर 4,250 रुपयांची सवलत मिळेल.
ज्यामुळे फोनची प्रभावी किंमत 54,749 रुपये इतकी होईल. म्हणजेच फोनवर एकूण 15,151 रुपयांची बचत होईल. iPhone 14 फोन A15 बायोनिक चिपने सुसज्ज आहे. यात 6.1 इंचाचा OLED डिस्प्ले तसेच यात दोन 12MP रियर कॅमेऱ्यांसह 12-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळेल.
iPhone 14 Plus ऑफर
iPhone 14 Plus चे 128GB मॉडेल Flipkart वर 79,900 रुपयांना खरेदी करता येईल. ते फक्त Rs 61,999 मध्ये उपलब्ध आहे. 17,901 रुपयांचा फ्लॅट डिस्काउंट मिळेल. खरेदीदारांना HDFC क्रेडिट कार्ड व्यवहारांवर 4,250 रुपयांची सवलत मिळेल.
फोनची प्रभावी किंमत 57,749 रुपये असून या फोनवर एकूण 22,151 रुपयांची बचत होत आहे. iPhone 14 Plus देखील A15 बायोनिक चिपने सुसज्ज आहे. फोनमध्ये 6.7 इंचाचा OLED डिस्प्ले आहे. यात दोन 12MP रियर कॅमेऱ्यांसह 12-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळेल.
iPhone 15 ऑफर
किमतीबद्दल बोलायचे झाले तर iPhone 15 चे 128GB मॉडेल फ्लिपकार्टवर 79,900 रुपयांना सूचीबद्ध केले आहे, परंतु ते केवळ 71,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. म्हणजेच 5,901 रुपयांची सवलत आहे. खरेदीदार ICICI किंवा SBI क्रेडिट कार्ड व्यवहारांवर 4,000 रुपयांची सवलत मिळेल.
त्यानंतर फोनची प्रभावी किंमत 67,999 रुपयांपर्यंत खाली येईल. या फोनवर एकूण 11,901 रुपयांची बचत होईल. iPhone 15 देखील A16 बायोनिक चिपने सुसज्ज आहे. यात 6.1 इंचाचा OLED डिस्प्ले असून फोनमध्ये दोन मागील कॅमेरे (48MP+12MP) आणि सेल्फीसाठी 12-मेगापिक्सेल कॅमेरा मिळेल.