Iphone Care Tips : आजच्या दिवसात मोबाइल नाही असा माणूस क्वचितच भेटेल. अनेक कंपन्यांचे मोबाइल लोकांकडे दिसतील. त्याच आयफोन (Iphone Care Tips) अगदीच वेगळा ठरतो. या फोनची किंमत जास्त तर आहे पण यात एकापेक्षा एक जबरदस्त फिचर्स येतात जे अन्य मोबाइलमध्ये शोधूनही सापडत नाहीत. बरेच लोक असे असतात की जे मोबाइल रात्री उशाला ठेऊन झोपतात. पण, ही सवय त्रासदायक ठरू शकते. खुद्द अॅपल (Apple) कंपनीने नुकताच याबाबत इशारा दिला आहे, तसेच याला प्रतिबंध करण्यासाठी अनेक उपायांचा उल्लेख केला आहे.
अॅपल कंपनीच्या म्हणण्यानुसार, चार्जिंग करताना तुम्ही तुमचा आयफोन तुमच्या उशीजवळ ठेवल्यास किंवा अगदी तुमच्या शरीराजवळ ठेवल्यास तुम्हाला धोका आहे. खरं तर, कंपनीच्या म्हणण्यानुसार, ब्लँकेट किंवा उशीखाली फोन ठेवून चार्जिंग केल्याने डिव्हाइस गरम होऊ शकते, ज्यामुळे आग, विजेचा धक्का, दुखापत आणि गंभीर नुकसान होण्याचा धोका असतो. अशा परिस्थितीत, हे टाळण्यासाठी, चांगली हवा असलेल्या ठिकाणी फोन ठेवूनच चार्ज करा.
अन्य चार्जर वापरू नका
इतकंच नाही तर अॅपलने थर्ड पार्टी चार्जर न घेण्याचा इशाराही दिला आहे. खरं तर, आयफोनमध्ये चार्जिंगशी संबंधित वाढते धोके लक्षात घेता, कंपनीने थर्ड पार्टी चार्जरबद्दल देखील काळजी घेण्यास सांगितले आहे. कंपनीच्या मते, स्वस्त थर्ड पार्टी चार्जर फोन आणि वापरकर्त्यासाठी धोकादायक ठरू शकतात, कारण त्यांच्यामध्ये सुरक्षा मानकांचा अभाव आहे. अशावेळी कंपनीचा चार्जरच वापरा.
तसेच, फोन चार्जिंगवर असताना त्यात कोणतेही काम करू नका, असे कंपनीने म्हटले आहे. आधी व्यवस्थित चार्ज करा आणि नंतर वापरा. याशिवाय अॅपलने वापरकर्त्यांना लिक्विड ठिकाणांपासून दूर राहणे, इलेक्ट्रिक शॉक टाळण्यासाठी आणि फोन खराब होण्याचा धोका कमी करण्याबाबत सतर्क राहण्यास सांगितले आहे.