iPhone 16 series : आयफोन प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे, कारण बाजारात आता लवकरच iPhone 16 सीरिज लाँच होणार आहे. या सीरिजमध्ये स्टायलिश लुकसह जबरदस्त फीचर्स मिळतील. कंपनी अनेक दिवसांपासून या सीरीजवर काम करत होती. ही सिरीज तुमच्यासाठी उत्तम पर्याय असू शकते.
आयफोन 16 प्रो कॅमेरा
माहितीनुसार iPhone 16 Pro Max मॉडेलमध्ये नवीन 48 मेगापिक्सलचा Sony IMX903 प्राइमरी कॅमेरा सेंसर देण्यात येईल. पण हे अपग्रेड फक्त प्रो मॅक्स व्हेरियंटपुरतेच मर्यादित असणार आहे. याशिवाय iPhone 16 Pro मॉडेलमध्ये Apple प्रेमींसाठी 48 मेगापिक्सलचा Sony IMX803 कॅमेरा सेंसर देण्यात येईल.
इतकेच नाही तर आयफोन 16 प्रो आणि आयफोन 16 प्रो मॅक्स मॉडेलमध्ये 48-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा सेन्सर समाविष्ट केला जाऊ शकतो. अपग्रेडसह, कमी-प्रकाशात कॅमेरा कार्यप्रदर्शन पूर्वीच्या तुलनेत अधिक सुधारू शकतो. पूर्वीप्रमाणेच, नवीन आयफोन सीरिजमध्ये 12-मेगापिक्सलचा टेलिफोटो कॅमेरा सेन्सर असेल जो 5x ऑप्टिकल झूम सपोर्टसह येऊ शकते.
iPhone 16 सीरिज तपशील
iPhone 16 Pro आणि Pro Max प्रकारांमध्ये मोठे 6.3 इंच आणि 6.9 इंच डिस्प्ले असतील जे पाहण्याचा आणि गेमिंगचा चांगला अनुभव देतील. फोनच्या या दोन्ही मॉडेल्समध्ये, पुढच्या पिढीतील A18 Pro प्रोसेसरसह मोठी बॅटरी दिली जाईल.
दरम्यान, हे लक्षात घ्या की iPhone 16 Pro मध्ये कोणतेही बटण मिळणार नाही. कंपनी तुम्हाला फिजिकल बटणांच्या जागी कॅपेसिटिव्ह बटणे देईल. जे हॅप्टिक प्रतिसादासह येतील. ही बटणे दाब जाणवतील आणि वास्तविक बटणांप्रमाणे काम करतील. कंपनी द्रुत व्हिडिओ कॅप्चर करण्यासाठी एक बटण देईल.