iPhone 16 : आयफोन 16 मध्ये दिसणार मोठा बदल, AI फीचर्ससह मिळेल 48 मेगापिक्सल कॅमेरा

iPhone 16 : सध्या सगळीकडे iPhone 16 ची चर्चा सुरु आहे. याला कारणही काहीसं तसंच आहे. कंपनी लवकरच भारतीय बाजारात iPhone 16 सीरिज लाँच करणार आहे. आयफोनप्रेमी अनेक दिवसांपासून या सीरिजची आतुरतेने वाट पाहत होते. अशातच आता लवकरच सीरिज धुमाकूळ घालेल.

iPhone 16 च्या डिझाईनमध्ये खास बदल तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. नवीन वापरकर्त्यांसाठी iPhone 16 आणि iPhone 16 Pro मध्ये ‘Capture Button’ दिले जाणार आहे. पॉवर बटणजवळच हे कॅप्चर बॅटण असू शकते.

जाणून घ्या खासियत

iPhone 16 Pro Max मॉडेलमध्ये नवीन 48 मेगापिक्सलचा Sony IMX903 प्राइमरी कॅमेरा सेंसर देण्यात येईल. पण हे अपग्रेड फक्त प्रो मॅक्स व्हेरियंटपुरतेच मर्यादित असणार आहे. याशिवाय iPhone 16 Pro मॉडेलमध्ये Apple प्रेमींसाठी 48 मेगापिक्सलचा Sony IMX803 कॅमेरा सेंसर देण्यात येईल.

इतकेच नाही तर आयफोन 16 प्रो आणि आयफोन 16 प्रो मॅक्स मॉडेलमध्ये 48-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा सेन्सर समाविष्ट केला जाऊ शकतो. अपग्रेडसह, कमी-प्रकाशात कॅमेरा कार्यप्रदर्शन पूर्वीच्या तुलनेत अधिक सुधारू शकतो. पूर्वीप्रमाणेच, नवीन आयफोन सीरिजमध्ये 12-मेगापिक्सलचा टेलिफोटो कॅमेरा सेन्सर असेल जो 5x ऑप्टिकल झूम सपोर्टसह येऊ शकते.

एआय फीचर्सही मिळतील

या सीरिजची मोठ्या प्रमाणात विक्री होण्याची शक्यता आहे. यावेळी कंपनी आयफोन 16 सह भरपूर एआय फीचर्स पॅक करण्याची शक्यता आहे. WWDC मध्ये Siri संदर्भात मोठे बदल अपेक्षित असून या काळात Siri मध्ये अनेक जनरेटिव्ह AI आधारित फीचर्स दिली जाऊ शकतात.

Leave a Comment