iPhone 15 Pro Max । महागडा आयफोन 20 हजारांनी स्वस्तात खरेदीची संधी, पहा संपूर्ण ऑफर

iPhone 15 Pro Max । तुम्ही आता महागडा आयफोन 20 हजारांनी स्वस्तात खरेदी करू शकता. कंपनीचा हा फोन तुम्हाला फ्लिपकार्ट शिवाय दुसऱ्या वेबसाइटवरूनही खरेदी करता येईल. पहा संपूर्ण ऑफर.

iPhone 15 Pro Max ऑफर

किमतीचा विचार केला तर iPhone 15 Pro Max फ्लिपकार्टवर 1,39,990 रुपयांना उपलब्ध आहे. तुम्हाला ICICI बँक क्रेडिट नॉन-ईएमआय, क्रेडिट आणि डेबिट कार्ड ईएमआय किंवा एसबीआय क्रेडिट कार्ड व्यवहारांद्वारे रु. 3,000 सवलत मिळेल. Flipkart Axis Bank कार्डद्वारे 5% कॅशबॅक ऑफर करत असून फ्लिपकार्ट कॉम्बो ऑफरद्वारे रु. 2,000 ची सवलत आणि निवडक मॉडेल्सच्या एक्सचेंजवर रु. 3,000 ची अतिरिक्त सवलत मिळेल.

या ठिकाणाहून खरेदी करा फोन

तुम्हाला इमॅजिन ऑनलाइन वरून 1,43,910 (256GB) च्या सुरुवातीच्या किमतीत Apple iPhone 15 Pro Max खरेदी करता येईल. तुम्ही SBI आणि ICICI बँक व्यवहारांवर EMI ऑफरद्वारे 3,000 रुपयांची झटपट सवलत मिळेल. Flipkart वरील iPhone 15 Pro Max डील ही एक चांगली डील आहे.

iPhone 15 Pro Max चा डिस्प्ले पूर्वीपेक्षा अधिक स्मूद आणि वेगवान असून डिस्प्लेसोबत नेहमी ऑन डिस्प्ले फीचर्स उपलब्ध आहे. डिस्प्लेसह HDR देखील समर्थित असून डॉल्बी व्हिजन उपलब्ध आहे. त्याची कमाल ब्राइटनेस 2000 nits असल्याने कडक सूर्यप्रकाशातही कोणतीही अडचण येत नाही. पूर्वीप्रमाणे, या फोनचा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट आणि प्रो-मोशन सपोर्टसह येतो.

इतकेच नाही तर डिस्प्लेचा कॉन्ट्रास्ट रेशो 20,00,000:1 आहे. iPhone 15 Pro Max चे एकूण वजन 221 ग्रॅम असून iPhone 14 Pro Max चे वजन 226 ग्रॅम होते. फोनची बॉडी ग्रेड-5 टायटॅनियमची आहे. मागील पॅनेल आणि समोर सिरेमिक शील्डसह काचेची बॉडी असेल. तर या शानदार फोनच्या बाजूला थोडे वक्र आहेत. दोन स्पीकर ग्रिल आणि टाईप-सी पोर्ट तळाशी उपलब्ध आहेत.

Leave a Comment