iPhone 15 Pro Max : iPhone वर सर्वात मोठी सवलत! ‘इतक्या’ सवलतीत खरेदी करता येईल सर्वाधिक मागणी असणारा फोन

iPhone 15 Pro Max : भारतीय बाजारात काही दिवसांपूर्वी iPhone 15 Pro Max लाँच केला. या फोनला बाजारात चांगली मागणी आहे. पण तुम्ही आता हा फोन हजारो रुपयांच्या सवलतीत खरेदी करता येईल. पहा ऑफर.

iPhone 15 Pro Max वर मिळेल शानदार सवलत

Amazon आणि Flipkart या दोन्हींवर सध्या मोठी सेल सुरू असून या सेलमध्ये, दोन्ही साइट्सवर 11,000 रुपयांच्या फ्लॅट डिस्काउंटनंतर iPhone 15 Pro Max केवळ Rs 1,48,900 मध्ये खरेदी करता येईल. म्हणजेच तुम्हाला या फोनवर 8,901 रुपयांची सवलत मिळेल. याशिवाय Flipkart तुम्हाला SBI कार्ड आणि Amazon ICICI बँक कार्डवर 1,000 रुपयांची झटपट सवलत देत आहे, ज्यामुळे या फोनची किंमत आणखी थोडी कमी होईल.

समजा जर तुम्ही तुमचा जुना फोन बदलून हा फोन विकत घेतल्यास तुम्हाला 40,000 रुपयांपर्यंत एक्सचेंज डिस्काउंट मिळू शकतो, परंतु ही सूट तुमच्या जुन्या फोनच्या मॉडेल आणि स्थितीवर अवलंबून आहे.

iPhone 15 Pro Max फीचर्स

या iPhone मध्ये 6.7 इंचाचा सुपर रेटिना XDR डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन प्रो मोशन टेक्नॉलॉजी, ऑलवेज ऑन डिस्प्ले सह देखील खरेदी करता येईल. डायनॅमिक आयलंड फीचर फोनमध्ये उपलब्ध असणार आहे. या फोनमध्ये मोठी बॅटरी दिली असून हा फोन एका चार्जवर 29 तास वापरता येतो.

Apple ने iPhone 15 Pro Max मध्ये नवीन A17 Pro चिपसेट दिला आहे, जो गेमिंग अनुभव वाढवतो. iPhone 15 Pro Max चे कार्यप्रदर्शन सुधारण्यासाठी, यात 6 कोर GPU आणि जटिल ऍप्लिकेशन्स आणि रे ट्रॅकिंग वैशिष्ट्ये मिळतील.

फोनमध्ये कस्टमाइज ॲक्शन बटण आणि नेक्स्ट जनरेशन पोर्ट्रेटची सुविधा असणार आहे. iPhone Pro Max च्या कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाले तर, याच्या मागील पॅनलमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप असेल. ज्यात 48MP मुख्य पोर्ट्रेट कॅमेरा, 24MP नवीन फोटोनिक कॅमेरा, तसेच 5X ऑप्टिकल झूमसह 12MP टेलिफोटो कॅमेरा तिसऱ्या कॅमेऱ्यात उपलब्ध असणार आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये 12MP कॅमेरा मिळेल.

Leave a Comment