iPhone 15 : तुम्ही आता स्वस्तात iPhone 15 खरेदी करू शकता. फ्लिपकार्ट तुम्हाला हजारोंच्या सवलतीत iPhone 15 खरेदी करण्याची संधी देत आहे. जाणून घ्या संपूर्ण ऑफर.
iPhone 15 ऑफर
Flipkart आता iPhone 15 च्या 128GB व्हेरिएंटवर 14 टक्के सवलत देत असून त्याची किंमत 67,999 रुपयांपर्यंत खाली आली आहे. Flipkart Axis Bank कार्ड वापरणे किंवा तुमच्या जुन्या स्मार्टफोनची देवाणघेवाण केली तर किंमत आणखी कमी होईल.
हे लक्षात घ्या की ट्रेड-इन मूल्य तुमच्या जुन्या फोनच्या स्थितीवर अवलंबून असते. निवडक क्रेडिट कार्डे नॉन-ईएमआय व्यवहारांवर रु. 1000 ची अतिरिक्त सवलत मिळेल. तसेच कंपनीच्या यलो कलर वेरिएंटवर 18% डिस्काउंट मिळत आहे. यानंतर तुम्ही कोणत्याही ऑफरशिवाय हा फोन 64,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल.
iPhone 15 ची फीचर्स
फीचर्सचा विचार केला तर iPhone 15 मध्ये 6.1 इंच डिस्प्ले आहे. कंपनीचा हा फोन गुलाबी, पिवळा, हिरवा, निळा आणि काळा या पाच रंगांच्या पर्यायांत खरेदी करता येईल. हा फोन 14 आणि पूर्वीच्या मॉडेल्सच्या डिझाइनचे अनुसरण करत असून त्याच्या पुढील बाजूस डायनॅमिक आयलंड नॉच मिळेल. जो गेल्या वर्षीच्या आयफोन 14 प्रो मॉडेलमध्ये पाहायला मिळाला होता. iPhone 15 ला 48-मेगापिक्सेलच्या प्राथमिक सेन्सरसह एक मोठे अपग्रेड मिळत असून ते कमी प्रकाशात चांगली छायाचित्रण आणि आकर्षक पोर्ट्रेट शॉट्स वितरीत करते.
iPhone 15 Apple च्या A16 Bionic चिपने सुसज्ज असून मागील वर्षीच्या iPhone 14 आणि iPhone 14 Plus मध्ये वापरल्या गेलेल्या A15 Bionic चिपसेटवरून अपग्रेड आहे. हे लक्षात घ्या की मागील वर्षी, प्रो मॉडेलला A16 चिप मिळाली, जी त्याच्या चांगल्या कामगिरीसाठी ओळखली जाते.