iPhone 14 Plus : सोडू नका अशी संधी! iPhone 16 लाँचपूर्वी कमी झाली iPhone 14 Plus ची किंमत, जाणून घ्या

iPhone 14 Plus : भारतीय बाजारात लवकरच iPhone 16 सीरिज लाँच होणार आहे. या सीरिजची ग्राहक अनेक दिवसांपासून वाट पाहत होते. अशातच iPhone प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्ही आता iPhone 16 लाँचपूर्वी iPhone 14 Plus खूप स्वस्तात खरेदी करू शकता. फ्लिपकार्टवर अशी संधी उपलब्ध आहे.

इतकेच नाही तर खरेदीदार डील सुलभ करण्यासाठी उपलब्ध ऑफर्सद्वारे अतिरिक्त सवलतींचा लाभ घेतील. यात बँक, एक्सचेंज आणि कॉम्बो ऑफरचा समावेश असणार आहे. समजा तुम्ही हा फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर iPhone 14 Plus वर उपलब्ध असलेल्या ऑफर नक्की पहा.

iPhone 14 Plus ची किंमत

किमतीचा विचार केला तर iPhone 14 Plus सध्या Rs 58,999 (128GB) च्या सुरुवातीच्या किमतीत खरेदीसाठी उपलब्ध आहे. इतकेच नाही तर 256GB आणि 512GB व्हेरिएंटची किंमत 68,999 रुपये आणि 88,999 रुपये इतकी आहे. हा फोन मिडनाईट, स्टारलाइट, लाल, निळा, जांभळा आणि पिवळा रंगांमध्ये सूचीबद्ध आहे. बँक ऑफरबद्दल बोलायचे झाल्यास तुम्हाला फ्लिपकार्ट ॲक्सिस बँक कार्डद्वारे 5 टक्के सूट घेऊ शकतात.

फोनवर उपलब्ध असलेल्या इतर ऑफर्सबद्दल बोलायचे झाले तर तुम्हाला एक्सचेंज डिस्काउंटद्वारे 50,000 रुपयांपर्यंत सवलत मिळेल. तुम्ही फ्लिपकार्ट कॉम्बो ऑफरद्वारे रु. 2,000 आणि UPI व्यवहाराद्वारे रु. 500 ची सवलत मिळेल. खरेदी दरम्यान, तुम्ही Apple AirPods Pro खरेदी केले तर तुम्ही अतिरिक्त 500 रुपये वाचवू शकता.

iPhone 14 Plus वर उपलब्ध असलेली ही डील उत्तम आहे. आपण आपल्या गरजेनुसार सर्वोत्तम मॉडेल निवडू शकता. समजा तुमचे बजेट 60,000 रुपयांपेक्षा कमी असल्यास तुम्हाला या किमतीत फक्त मोठ्या स्क्रीनचा (6.7 इंच) iPhone हवा असेल, तर iPhone 14 Plus खरेदी करण्याची ही चांगली वेळ असू शकते.

Leave a Comment