iPhone 14 Plus: भारतीय बाजारात येत्या काही दिवसात iPhone 15 लॉन्च होणार आहे यामुळे सध्या बाजारात iPhone 14 Plus वर जबरदस्त बंपर ऑफर जाहीर करण्यात आला आहे.
या ऑफरचा तुम्ही फायदा घेत तुमच्यासाठी प्रीमियम फीचर्ससह येणारा स्मार्टफोन अगदी कमी किमतीमध्ये घरी आणू शकतात.
iphone 14 डिस्काउंट ऑफर
तुमच्या माहितीसाठी जाणुन भारतीय बाजारात 128 GB स्टोरेज iphone 14 व्हेरियंटची किंमत 76,999 रुपये आहे. सवलतीनंतर तुम्ही ते फ्लिपकार्टवर रु.72,999 मध्ये खरेदी करू शकता. तसेच, बँक ऑफर अंतर्गत, HDFC बँकेच्या कार्डवरून 4000 रुपयांची सूट मिळत आहे. त्याच वेळी तुम्हाला यावर 48,999 रुपयांची एक्सचेंज ऑफर दिली जात आहे.
iphone 14 फीचर्स
या फोनमध्ये 6.7 इंचाचा सुपर रेटिना एक्सडीआर डिस्प्ले देण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी यात 12 MP चा ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. तर समोर 12MP कॅमेरा उपलब्ध आहे. तसेच, हा फोन 6nm आधारित A15 बायोनिक चिपसेट सपोर्टसह येतो.
तर दुसरीकडे हे जाणुन घ्या की सप्टेंबर 2023 मध्ये iPhone 15 सिरीजचे जागतिक लॉन्च होणार आहे.
जागतिक लॉन्चपूर्वी iPhone 15 सिरीजमधील अनेक फीचर्स समोर आली आहेत ज्यात एक नवीन शक्तिशाली प्रोसेसर, C-type चार्जिंग पोर्ट आणि इतर अनेक बदल समाविष्ट आहेत.