iPhone 14 Plus : 27,401 रुपयांच्या बचतीसह खरेदी करा iPhone चा ‘हा’ फोन, पहा संपूर्ण ऑफर

iPhone 14 Plus : Apple च्या सर्वच फोनची किंमत इतर स्मार्टफोनच्या तुलनेत जास्त असते. तुम्ही आता iPhone 14 Plus हा फोन फ्लिपकार्टवरून हजारोंची बचत करून खरेदी करू शकता. पहा ऑफर.

iPhone 14 Plus ची किंमत

Apple ने सप्टेंबर 2022 मध्ये iPhone 14 सीरिज लाँच केली असून किमतीचा विचार केला तर लॉन्चच्या वेळी, iPhone 14 Plus च्या 128GB वेरिएंटची किंमत 89,900 रुपये इतकी होती. मागील वर्षी, आयफोन 15 सीरिजचे मॉडेल लॉन्च केले गेले होते,

त्यावेळी Apple ने त्याची किंमत 10,000 रुपयांनी कमी केली होती, त्यानंतर ते 79,900 रुपयांना खरेदी करता येत आहे. Apple च्या अधिकृत साइटवर हे अजूनही 79,900 रुपयांमध्ये उपलब्ध आहे परंतु तुम्ही ते फ्लिपकार्टवरून खरेदी करून हजारो रुपयांची बचत करू शकता.

बँक ऑफर

ऑफरचा विचार केला तर iPhone 14 Plus चा 128GB प्रकार Flipkart वर फक्त Rs 56,999 मध्ये उपलब्ध आहे. म्हणजे त्याच्या मूळ किंमतीपेक्षा 22,901 रुपये कमी. आतापर्यंतची ही सर्वात मोठी सूट असल्याचे सांगण्यात येत असून बँक आणि एक्सचेंज ऑफरचा फायदा घेऊन तुम्ही त्याची किंमत आणखी कमी करता येईल.

Flipkart HSBC क्रेडिट कार्ड आणि EMI व्यवहारांद्वारे केलेल्या खरेदीवर ग्राहकांना 4,500 रुपयांची सवलत देत असून यासाठी किमान व्यवहार मूल्य 56000 रुपये असावे. यानंतर, फोनची प्रभावी किंमत केवळ 52,499 रुपयांपर्यंत खाली येते. म्हणजेच, बँकेच्या ऑफरचा फायदा घेऊन, तुम्ही मूळ किमतीपेक्षा 27,401 रुपये कमी किमतीत iPhone 14 Plus खरेदी करता येईल.

फ्लिपकार्ट फोनवर एक्सचेंज बोनस देत आहे. जर तुमच्याकडे एक्सचेंज करण्यासाठी जुना फोन असल्यास तुम्हीही याचा फायदा घेऊ शकता. एक्सचेंज व्हॅल्यूची रक्कम जुन्या फोनची स्थिती, मॉडेल आणि ब्रँड यावर अवलंबून असते.

Leave a Comment