iPhone 14: स्मार्टफोन कंपनी Apple ने नवीन स्मार्टफोन सिरीज iPhone 15 जबरदस्त फीचर्ससह लॉन्च केली आहे. तर दुसरीकडे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपनीने iPhone 14 आणि iPhone 14 Plus च्या किमती कमी केल्या आहेत.
यामुळे जर तुम्ही iPhone 14 किंवा iPhone 14 Plus खरेदीचा विचार करत असाल तर तुम्ही आता कमी किमतीमध्ये फोन खरेदी करू शकतात.
iPhone 14 आणि iPhone Plus ऑफर
Apple ने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये अनुक्रमे ₹79,900 आणि ₹89,900 च्या किमतीत iPhone 14 आणि iPhone Plus लाँच केले. मात्र, आता कंपनीने त्याच्या किमतीत लक्षणीय घट केली आहे.
iPhone 14 128 GB व्हेरिएंटसाठी ₹ 69,900, 256 GB व्हेरिएंटसाठी ₹ 79,900 आणि 512 GB व्हेरिएंटसाठी ₹ 99,900 च्या किमतीत उपलब्ध आहे. तर iPhone 14 Plus च्या 128 GB व्हेरिएंटची किंमत ₹ 79,990 आहे. आणि त्याचा 256 GB व्हेरिएंट ₹ 89,990 च्या किमतीत उपलब्ध आहे आणि 512 GB व्हेरिएंट ₹ 1,09,990 च्या किमतीत उपलब्ध आहे. याव्यतिरिक्त, तुम्हाला HDFC बँकेच्या क्रेडिट कार्डवर ₹8,000 चा झटपट कॅशबॅक मिळेल.
iPhone 14 आणि iPhone 14 Plus तपशील
iPhone 14 मध्ये, तुम्हाला A15 Bionic चिपसेटसह 6.1 इंचाचा सुपर रेटिना XDR डिस्प्ले मिळेल. ज्याचे पिक्सेल रिझोल्यूशन 2532×1170 आहे. त्याच्या मागील बाजूस 12MP मेन कॅमेरा आहे.
याशिवाय, तुम्हाला iPhone 14 Plus मध्ये 6.7 इंचाचा एक मोठा सुपर रेटिना XDR OLED डिस्प्ले मिळेल. जे A15 बायोनिक चिपसेटसह येते आणि त्यात iOS 16 ऑपरेटिंग सिस्टम आहे.