iPhone 13 offer : तुम्ही आता स्वस्तात iPhone 13 खरेदी करण्याची इच्छा पूर्ण करू शकता. यामुळे तुम्हाला हजारो रुपयांची बचत करता येईल. या फोनमध्ये तुम्हाला अनेक शानदार फीचर्स आणि स्पेसिफिकेशन पाहायला मिळतील.
iPhone 13 वर उपलब्ध असलेल्या सवलतीच्या ऑफर पाहिली तर Amazon सध्या कोणत्याही बँकेच्या ऑफरशिवाय एक चांगली संधी देत आहे. किमतीचा विचार केला तर तुम्ही हा फोन आता Amazon वरून फक्त Rs 48,999 मध्ये सहज खरेदी करू शकता. तर हा फोन सध्या फ्लिपकार्टवर ५३,९९९ रुपयांना उपलब्ध आहे. इतकेच नाही तर फ्लिपकार्ट 5901 रुपयांचे डिस्काउंट कूपन देखील देत आहे, ज्यामुळे फोनची किंमत लक्षणीयरीत्या कमी होते.
iPhone 13 चे फीचर्स
iPhone 13 मध्ये 6.1-इंचाचा OLED डिस्प्ले तसेच एक शक्तिशाली A15 बायोनिक चिप, आणि मागे ड्युअल-कॅमेरा सिस्टीम आणि 12MP फ्रंट कॅमेरा दिला आहे. ज्यात 12MP अधिक 12MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा मिळेल. पण Apple ने बॅटरीच्या तपशीलाबद्दल काहीही सांगितले नाही, रिपोर्टनुसार, हा फोन 20W फास्ट चार्जिंग सपोर्टसह सुमारे 3240mAh बॅटरी देते.
दोन वर्षांहून जास्त जुने असूनही, iPhone 13 अजूनही अनेक शक्तिशाली स्मार्टफोनशी स्पर्धा करते. A15 बायोनिक चिप 2024 मध्ये उत्कृष्ट कार्यप्रदर्शन देत आहे, जी दैनंदिन वापरात तसेच गेमिंग आणि अगदी फोटो व्हिडिओ संपादनातही उत्तम आहे.
तुम्ही तो 2024 मध्ये देखील खरेदी करू शकता. हे लक्षात घ्या की फोन 6.1-इंचाच्या सुपर रेटिना XDR डिस्प्लेसह येते, जे व्हिडिओ पाहण्यासाठी किंवा वेब ब्राउझ करण्यासाठी सर्वात उत्तम आहे. तुम्हाला फोनमध्ये 128GB ते 512GB पर्यंत वेगवेगळे स्टोरेज पर्याय मिळेल.