iPhone 13 : आयफोन लव्हरसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो तुम्हाला जर iPhone 13 किंवा iPhone 14 खरेदीचा विचार करत असाल तर आता तूम्ही बंपर डिस्काउंट फोन खरेदी करू शकतात.
हे जाणुन घ्या की Apple च्या नेक्स्ट जनरेशन iPhone 15 सीरीज पुढील महिन्यात लॉन्च होणार आहे. यामुळे सध्या फ्लिपकार्टवर मोठ्या प्रमाणात डिस्काउंट ऑफर्स देण्यात येत आहेत. चला मग जाणुन घ्या या ऑफरबद्दल सविस्तर माहिती.
iPhone 13 किंमत
तुम्ही फ्लिपकार्टवर रिलीज झालेल्या बिग सेव्हिंग डेज सेलमध्ये (19 जुलै, शेवटचा दिवस) 58,499 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत iPhone 13 खरेदी करू शकता. परंतु बँक ऑफर अंतर्गत, तुम्हाला ते Axis Bank कार्डवरून रु. 1000 च्या अतिरिक्त सूटसह 57,499 रुपयांना खरेदी करता येत आहे. तुम्ही iPhone 13 खरेदी करू शकता जो 256 GB स्टोरेजमध्ये आहे 68,499 रुपये, त्याची मूळ किंमत 79,900 रुपये आहे. त्याचप्रमाणे, तुम्ही iPhone 13 512GB रु.88,499 मध्ये खरेदी करू शकता, तर त्याची मूळ किंमत रु.99,900 आहे.
iPhone 14 ऑफर
त्याचप्रमाणे तुम्ही iPhone 14 चा 128 GB फोन 68,999 रुपयांच्या प्रारंभिक किमतीत खरेदी करू शकता, ज्याची वास्तविक किंमत 79,900 रुपये आहे. त्याच वेळी, iPhone 14 Plus, ज्याची 128 GB ची प्रारंभिक किंमत 73,999 रुपये आहे, तर त्याची मूळ किंमत 89,900 रुपये आहे.
एवढेच नाही तर, तुम्ही ग्राहकांना iPhone 14 Pro Max (सिल्व्हर, 128 जीबी) मॉडेल 1,27,999 रुपयांना खरेदी करता येत आहे, जरी त्याची वास्तविक किंमत 1,39,900 रुपये आहे.
तुम्हाला माहितीसाठी सांगतो, Apple iPhones सह रिटेल बॉक्समध्ये चार्जर देत नाही. आयफोन खरेदी केल्यानंतर, चार्जर घेण्यासाठी तुम्हाला अतिरिक्त खर्च करावा लागेल.