iPhone 13 । तुम्ही आता Amazon प्राइम डे सेलमध्ये iPhone 13 हजारो रुपयांच्या सवलतीत खरेदी करू शकता. या ऑफरमुळे तुम्हाला स्वस्तात शानदार फीचर्स असणारा फोन खरेदी करता येईल. जाणून घ्या संपूर्ण ऑफर.
हा फोन सेलमध्ये 47,999 रुपयांच्या किमतीत विकला जाईल. या डीलमध्ये बँक ऑफर, ॲमेझॉन कूपन आणि डिस्काउंटचा समावेश आहे. तुम्ही तुमचा जुना फोन विकून नवीन फोन विकत घेतला तर तुम्हाला 30,000 रुपयांपर्यंत एक्सचेंज डिस्काउंट मिळेल. iPhone 13 79,900 रुपयांमध्ये लॉन्च केला होता. iPhone 15 सीरीज लॉन्च केल्यानंतर Apple ने iPhone 13 ची किंमत 59,900 रुपयांपर्यंत वाढवली होती. पण आता हा फोन 10,000 रुपयांनी स्वस्त होत आहे.
तुम्हाला Amazon ऐवजी इतर कुठल्यातरी साइटवरून iPhone 13 विकत घ्यायचा असल्यास Apple च्या वेबसाइटवर 59,900 रुपये, Vijay Sales वर 51,990 रुपये आणि Croma वर 52,090 रुपये किंमतीला विकण्यात येतआहे. Flipkart वर iPhone 13 ची किंमत सध्या 51,999 रुपये इतकी आहे. या किंमती बेस 128GB वेरिएंटसाठी आहेत, हे लक्षात घ्या.
iPhone 13 मध्ये 6.1-इंच सुपर रेटिना XDR OLED डिस्प्लेसह अनेक प्रभावी फीचर्सचा समावेश आहे. हा शानदार फोन A15 बायोनिक चिपसेटसह येते. iPhone 13 ची बॅटरी 3,240 mAh आहे आणि ती नवीनतम iOS वर चालते.
iPhone 13 मध्ये 12MP ड्युअल रियर कॅमेरा आणि 12MP फ्रंट-फेसिंग कॅमेरा सेल्फी, व्हिडिओ कॉल इत्यादीसाठी आहे. तर, जर तुमचे बजेट कमी असेल पण तरीही तुम्ही आयफोन प्रेमी असाल तर तुम्हाला iPhone 13 खरेदी करता येईल.