Investment Tips : अनेकजण ज्या ठिकाणी सर्वात जास्त परतावा मिळेल तिथे गुंतवणूक करतात. पण अनेकांना सर्वात जास्त परतावा कुठे मिळेल हे माहिती नसते. पण तुम्ही या ठिकाणी पैसे गुंतवले तर तुम्हाला सर्वाधिक पैसे मिळतील.
1 वर्षात वाढली किंमत
अहवालानुसार, देशातील आठ प्रमुख शहरांमध्ये घरांच्या किमती 19 टक्क्यांपर्यंत वाढल्या असून बंगळुरूमध्ये सर्वात जास्त १९ टक्के वाढ झाली आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये ही वाढ 16 टक्के इतकी होती. मालमत्तेतील गुंतवणुकीबद्दल बोलायचे झाले तर मागील 5 वर्षांत मेट्रो शहरांमधील मालमत्तेची किंमत दुप्पट झाली आहे.
ही किंमत मेट्रो शहरातील मालमत्तेच्या जागेवर अवलंबून आहे. पॉश भागातच दर दुपटीने वाढले आहेत. जर आपण ग्रामीण किंवा टियर-3 शहरांबद्दल बोलायचे झाले तर मागील 5 वर्षांत तिथल्या मालमत्तांचे दर 30 ते 40 टक्क्यांनी वाढले आहेत.
रिअल इस्टेट कंपनीचे शेअर्स
हे लक्षात घ्या की रिअल इस्टेट कंपनीच्या शेअर्सने एका वर्षात गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला असून अनेक कंपन्या आहेत ज्यांनी एका वर्षात 100 टक्क्यांहून जास्त परतावा दिला आहे, म्हणजेच त्यांनी गुंतवलेल्या रकमेच्या दुप्पट वाढ केली आहे.
1. डीएलएफ लि
रिअल इस्टेटमध्ये काम करणारी ही एक मोठी कंपनी असून या कंपनीच्या शेअरची किंमत सुमारे 850 रुपये इतकी आहे. मागील एका वर्षात कंपनीने सुमारे 81 टक्के परतावा दिला आहे. तुम्ही वर्षभरापूर्वी यामध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर तुम्हाला 81 हजार रुपयांचा नफा झाला असता. तसेच तुमची एकूण रक्कम 1.81 लाख रुपये झाली असती.
2. मॅक्रोटेक डेव्हलपर्स लि
या कंपनीने 1 वर्षात गुंतवणूकदारांना चांगला परतावाही दिला असून किमतीचा विचार केला तर वर्षभरापूर्वी या कंपनीच्या शेअरची किंमत सुमारे 495 रुपये होती, ती आता सुमारे 142 टक्क्यांनी वाढून सुमारे 1197 रुपये झाली असून तुम्ही वर्षभरापूर्वी यामध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर तुम्हाला 1.42 लाख रुपयांचा फायदा झाला असता.
3. गोदरेज प्रॉपर्टीज लि
रिअल इस्टेटमध्येही गोदरेज प्रॉपर्टीजचे नाव चांगले प्रसिद्ध असून या कंपनीच्या शेअर्सनेही 1 वर्षात गुंतवणूकदारांना दुप्पट परतावा देण्यात आला आहे. वर्षभरापूर्वी त्याच्या शेअरची किंमत सुमारे 1384 रुपये इतकी होती. आता त्याची किंमत सुमारे 106 टक्क्यांनी वाढ होऊन 2858 रुपये झाली आहे. जर तुम्ही वर्षभरापूर्वी त्यात 1 लाख रुपये गुंतवल्यास ही रक्कम सुमारे 2 लाख रुपये झाली असती, म्हणजेच तुम्हाला सुमारे 1 लाख रुपयांचा थेट नफा मिळाला असता.
कशात करावी गुंतवणूक?
गुंतवणूक तज्ज्ञ म्हणाले की, शेअर्समध्ये गुंतवणूक करणे धोक्याचे असून यात आज दिसणारा नफा उद्या असेल की नाही हे सांगणे कठीण आहे. तर मालमत्तेच्या किमती वाढण्याची गती मंद असली तरी ती नक्कीच वाढत आहे. आपण ती मालमत्ता भाड्याने देऊन कायमस्वरूपी उत्पन्न मिळवू शकता. मालमत्तेच्या किमती वाढतील.