Investment Tips : FD की PPF? कशात करावी गुंतवणूक? समजून घ्या संपूर्ण गणित

Investment Tips : अनेकजण FD तसेच PPF मध्ये गुंतवणूक करतात. पण तुम्हाला कोठे जास्त व्याज मिळेल? हे माहिती असावे लागते. नाहीतर तुम्हाला परतावा अपेक्षित मिळणार नाही. काही गुंतवणुकीवर तुम्हाला कर भरावा लागतो.

जर तुम्ही पीपीएफ किंवा फिक्स डिपॉझिटमध्ये गुंतवणूक केली असेल तर किती वर्षांनी तुमची ठेव दुप्पट होऊ शकतात. तुमचे पैसे केवळ दुप्पट होणार नाहीत, तर तुम्हाला कर लाभ देखील मिळू शकतात. जोपर्यंत PPF चा संबंध आहे, ही योजना EEE च्या श्रेणीत येते. जमा केलेल्या पैशावर आणि त्याच्या व्याजावर कर सूट मिळते. या योजनेतील गुंतवणुकीवर तुम्ही 1.5 लाख रुपयांपर्यंत कर वाचवता येईल.

पीपीएफमधील गुंतवणूक

तुम्हाला नियम 72 बद्दल माहिती असावा, या नियमात तुम्हाला गुंतवणुकीचा परतावा किंवा व्याज 72 ने विभाजित करावे लागणार आहे. यावरून तुम्हाला कितीही आकडा मिळेल, तो अगदी अचूक असेल. तुम्ही पीपीएफमध्ये गुंतवणूक केल्यास आणि किती वर्षांत पैसे दुप्पट होतील हे जाणून घ्यायचे असल्यास तुम्हाला नियम 72 वरून सहज कळू शकेल. सध्या, PPF वर 7.1 टक्के दराने व्याज उपलब्ध असून तुम्हाला 72 ला 7.1 ने विभाजित करावे लागेल ज्याचा परिणाम 10.14 होईल. PPF मधील तुमचे पैसे 10.14 वर्षात दुप्पट होऊ शकतात.

FD मधील गुंतवणूक

मुदत ठेव अर्थात FD साठी तुम्हाला नियम 72 लागू करावा लागणार आहे. हे लक्षात ठेवा की जेव्हा दर समाधानकारक असल्यास तेव्हाच तुम्हाला गुंतवणुकीवर जास्तीत जास्त व्याज मिळेल. सध्या FD वर 2.90 टक्के ते 7 टक्के व्याज असून ज्येष्ठ नागरिकांसाठी हा दर ७.५० टक्क्यांपर्यंत आहे.

आपण 5 वर्षांपेक्षा जास्त कालावधीच्या एफडीवर नजर टाकली तर बँकांचा कमाल व्याज दर सुमारे 6.25 टक्के आहे. हा दर वार्षिक आधारावर देण्यात येतो. येथे नियम 72 लागू केला तर FD मध्ये जमा केलेले पैसे 11 वर्षांत दुप्पट होतील. FD वरील व्याजदर करपात्र असतो. तुम्ही ज्या टॅक्स स्लॅबमध्ये आहात त्यानुसार तुम्हाला कर भरावा लागू शकता.

Leave a Comment