Investment Tips : एफडी करताना करू नका ‘ही’ चूक, नाहीतर होईल आर्थिक नुकसान

Investment Tips : अनेकजण एफडीमध्ये गुंतवणूक करतात. पण एफडी करत असताना काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. नाहीतर तुम्हाला खूप मोठा आर्थिक फटका बसू शकतो. कसे ते जाणून घ्या.

कमी नफा

बाजारात झालेल्या नफ्याचा फायदा होत नाही. कारण यात व्याजदर स्थिर राहत असून महागाईचा दर 6 टक्के झाला आणि तुम्हाला मिळणारे व्याज फक्त 5 ते 6 टक्के असल्यास अशा वेळी फक्त नकारात्मक परतावा मिळतो.

मिळेल कमी परतावा

मुदत ठेवींमध्ये गुंतवणूक करण्याचा पहिला तोटा म्हणजे त्यातील व्याजदर निश्चित असून बँकेने तुम्हाला दिलेले व्याज स्थिर राहते. स्टॉक किंवा म्युच्युअल फंड यांसारख्या इतर गुंतवणुकीच्या पर्यायांमध्ये मिळणारे व्याज FD पेक्षा जास्त असते.

कमी व्याज

हे लक्षात घ्या की गरजेनुसार पैसे काढायचे असतील तर एफडी मोडता येत नाही. पण तुम्ही तो मोडला तरी बँक तुम्हाला व्याज देत नाही. तुम्हाला दंड भरावा लागतो. विशेष म्हणजे एफडी करताना काय दंड होऊ शकतो हे अटींमध्ये लिहिले असते.

डीफॉल्टचा धोका

गुंतवणूकदारांच्या ठेवींना धोका जास्त असतो. नवीन नियमानुसार, बँक बुडाली तर एकूण ठेवींचा 5 लाख रुपयांपर्यंत विमा उतरवला जातो. अशा वेळी जर तुम्ही बँकेत 15 लाख रुपयांची एफडी केली असल्यास ती बँक दिवाळखोरीत निघाली तर तुम्हाला फक्त 5 लाख रुपये मिळतील. उर्वरित पैसे बुडू शकतो.

Leave a Comment