Investment Plan : तुम्ही गुंतवणुकीचे पर्याय (Investment Plan) शोधत असाल आणि तुम्हाला धोका पत्करायचा नसेल तर तुमच्यासाठी RD (Recurring Deposit) आणि FD (Fixed Deposit) हे गुंतवणुकीचे उत्तम पर्याय असू शकतात.
आवर्ती ठेव (RD) आणि फिक्स्ड डिपॉझिट (FD) हे दोन्ही असे गुंतवणुकीचे पर्याय आहेत ज्यात तुम्हाला कोणताही धोका न घेता चांगला परतावा मिळू शकतो. जरी या दोघांमध्ये काही फरक आहे. जर तुम्हाला तुमचा पैसा जोखीम न घेता गुंतवायचा असेल तर हे दोन्ही पर्याय तुमच्यासाठी सर्वात योग्य असतील. या दोन्ही योजनात जोखीम नाही आणि बँकेत तुमचा पैसाही सुरक्षित राहतो.
RD मध्ये गुंतवणुकीचे फायदे
आवर्ती ठेव (Recurring Deposit) हा डेट फंड गुंतवणुकीचा एक प्रकार आहे. अल्प मुदतीच्या गुंतवणुकीसाठी हा एक आदर्श पर्याय आहे. तुम्ही यामध्ये सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) द्वारेही गुंतवणूक करू शकता. तुम्ही ते तुमच्या बँकेद्वारे उघडू शकता. त्याचा कालावधी 1 वर्ष ते 10 वर्षांपर्यंत असतो. बँक बुडली तरच यात धोका आहे. तथापि या अंतर्गत बँकांकडून 5 लाख रुपयांच्या रकमेवर सुरक्षा प्रदान केली जाते. म्हणजेच बँक बुडल्यास तुमचे 5 लाख रुपये परत केले जातील.\
मुदत ठेवीचे फायदे
एफडीमध्ये (Fixed Deposit) गुंतवणूक हा गुंतवणुकीचा पारंपरिक पर्याय मानला जातो. यामध्ये गुंतवणूक करणे नेहमीच फायदेशीर आणि सुरक्षित असते. अलीकडे एफडीवर बँकांकडून मिळणाऱ्या व्याजातही वाढ झाली आहे. यामध्ये आरडीपेक्षा जास्त फायदेही मिळतात. यामध्येही तुमचे पैसे गमावण्याचा धोका खूप कमी असतो. यामध्ये तुम्ही 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंत गुंतवणूक करू शकता.
हे पर्यायही आहेत बेस्ट
PPF (सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी)
पीपीएफ बचत आणि गुंतवणुकीचा एक अतिशय लोकप्रिय मार्ग आहे. याला भारत सरकारचा पाठिंबा आहे आणि त्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तो जोखीममुक्त आहे तसेच परताव्याची हमी आहे. ही योजना तिच्या कर लाभांसाठी देखील ओळखली जाते. विशेष म्हणजे तुम्ही तुमची गुंतवणूक 500 रुपयांपासून सुरू करू शकता.
NSC (राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र)
सरकार समर्थित गुंतवणूक योजना NSC ही एक कर बचत योजना आहे, जी कोणत्याही पोस्ट ऑफिस, सार्वजनिक क्षेत्रातील बँक आणि अधिकृत खाजगी बँकेद्वारे सहज मिळवता येते. ही एक पारंपारिक गुंतवणूक मानली जाते, जिथे जोखीम खूप कमी असते. याद्वारे तुम्ही तुमचा गुंतवणूक फक्त एक हजार रुपयांपासून सुरू करू शकता. यामध्येगुंतवणूकदाराला कलम 80C अंतर्गत कर सूट मिळते. त्यामुळे जर तुम्ही निश्चित उत्पन्नाच्या शोधात असाल आणि कमी जोखीम पत्करून स्थिर आणि खात्रीशीर परतावा मिळवू इच्छित असाल तर ही योजना तुमच्यासाठी अधिक चांगली ठरू शकते.
तुम्ही तुमच्या गुंतवणुकीसाठी स्थिर परतावा शोधत असाल तर बचत विमा योजना तुमच्यासाठी अधिक चांगली ठरू शकते. ही एक प्रकारची जीवन विमा योजना आहे जिथे पॉलिसी धारकाला बचत आणि गुंतवणूक दोन्हीचा पर्याय मिळतो. याद्वारे एखादी व्यक्ती स्वत:ला आणि कुटुंबाला आर्थिकदृष्ट्या सुरक्षित ठेवू शकते. ही योजना शिस्तबद्ध बचतीला चालना देण्यासाठी, स्थिर परतावा ऑफर करण्यासाठी, ज्यामुळे तुम्हाला तुमची आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यात मदत होईल.
दरम्यान, कोरोनानंतरचे जग अनुभवताना बरेच बदल जाणवतात. त्यातही आर्थिक नियोजनाचे महत्व वाढले आहे. कोरोनाच्या संकटात जसा आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला तसाच आर्थिक नियोजनाचीही समस्या अनेकांनी जाणवली. भविष्याचा अंदाज न घेता गुंतवणुकीकडे दुर्लक्ष केल्याचा फटका अनेकांना बसला. त्यामुळे आता कोरोनानंतर लोकांना आरोग्य आणि पैशांच्या योग्य गुंतवणुकीवर लक्ष केंद्रीत केल्याचे दिसते.
आपल्या सर्वांचे जीवन अनेक अनिश्चिततेने भरलेले आहे. आपल्यासोबत कधीही काहीही होऊ शकते त्यामुळे बचत आणि गुंतवणूक योजनेच्या रूपात तुम्ही स्वत:ला तयार करणे महत्त्वाचे आहे. आज आपल्याकडे बचत करण्याचे अनेक मार्ग आहेत, परंतु काही बचत योजना आहेत ज्या दीर्घकाळासाठी फायदेशीर ठरू शकतात.