Investment Options । अनेकांचे बँकेत खाते असते. प्रत्येक बँक वेगवेगळे व्याज देत असते. सेव्हिंग अकाउंटवरही तुम्हाला फिक्स्ड डिपॉझिट म्हणजेच FD सारखे व्याज मिळू शकते आणि त्यासाठी किमान शिल्लक राखण्याची गरज नाही.
मिळेल एफडी सारखे व्याज-
सर्वसाधारणपणे बचत खात्यात किमान शिल्लक ठेवावी लागते. तुम्ही असे केले नाहीतर बँका तुमच्याकडून शुल्क आकारतात. जर आपण बचत खात्यावरील व्याजदराबद्दल बोललो तर तो साधारणपणे 4 टक्के असतो. अशी एक बँक देखील आहे जिथे तुम्हाला मुदत ठेवी सारखे व्याज मिळू शकते म्हणजेच बचत खात्यावरील FD कोणत्याही किमान शिल्लकशिवाय.
अलीकडेच आरबीएल बँकेने गो खाते नावाने डिजिटल बचत खाते सुरू केले असून हे शून्य शिल्लक खाते आहे, ज्यात तुम्हाला ७.५ टक्के दराने परतावा मिळेल. RBL बँकेचे हे विशेष बचत खाते आहे.
मिळेल 1 कोटी रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण-
RBL बँकेच्या वेबसाइटनुसार, या बचत खात्यावर तुम्हाला फ्री प्रीमियम गो डेबिट कार्ड, फ्री क्रेडिट रिपोर्ट, सहज रोख पैसे काढण्याची सुविधा मिळेल. याशिवाय 1 कोटी रुपयांपर्यंतचे सायबर विमा संरक्षण, अपघात विमा संरक्षण आणि प्रवास विमा संरक्षण मिळेल.
मिळतील हे फायदे
हे झिरो बॅलन्स खाते सबस्क्रिप्शन बँक खाते असून लाभ घेण्यासाठी तुम्हाला वार्षिक शुल्क भरावे लागणार आहे. पहिल्या वर्षासाठी सदस्यता शुल्क 1999 रुपये असून तुम्हाला वार्षिक 500 रुपये द्यावे लागतील. याशिवाय तुम्हाला जीएसटीही भरावा लागेल. या खात्यासोबत येणाऱ्या डेबिट कार्डद्वारे तुम्ही वर्षभरात 1 लाख रुपयांपेक्षा जास्त खर्च केला तर हा वार्षिक शुल्क तुमच्यासाठी माफ केला जाईल.
विशेष शून्य शिल्लक खाते
आरबीएल बँकेचे हे शून्य शिल्लक खाते चालू करण्यासाठी तुमच्याकडे पॅन कार्ड आणि आधार कार्ड अअसावे लागते. जर तुमच्याकडे ही कागदपत्रे असतील तर तुम्ही ॲप्स किंवा ऑनलाइन साइट्सच्या मदतीने हे खाते चालू करू शकता. ते डिजिटल खाते असल्याने तुम्ही ते घरी बसल्या तुमच्या मोबाईलवरून ते सहज ॲक्सेस करू शकता.