Investment in FD : गुंतवणूकदारांची चांदी! ‘या’ बँका देत आहेत FD वर सर्वाधिक व्याज

Investment in FD : बँक एफडीमधील गुंतवणूक जास्त सुरक्षित असते. येथे पैसे गुंतवले तर जास्त व्याज देखील मिळते. त्यामुळे अनेकजण बँक एफडीमध्ये गुंतवणूक करतात.जर तुम्हीही बँक एफडीमध्ये गुंतवणूक करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. जास्त व्याज देत आहेत.

FD म्हणजेच मुदत ठेव हे गुंतवणुकीचे सर्वात सुरक्षित आणि लोकप्रिय माध्यम आहे. खात्रीशीर उत्पन्नासह सुरक्षित गुंतवणुकीसाठी, लोक त्यांची बचत FD मध्ये गुंतवतात. जर तुम्हाला FD वर चांगला परतावा हवा असेल तर तुम्ही तुमचे पैसे बंपर व्याजदर देणाऱ्या बँकांमध्ये गुंतवू शकता.

जर तुम्ही FD गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक हा तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. सूर्योदल स्मॉल फायनान्स बँकेला FD वर बंपर परतावा दिला जात आहे. ही बँक तुम्हाला FD वर 9.60 टक्क्यांपर्यंत व्याज देत असून या ठिकाणी तुम्ही 5 वर्षांसाठी एफडी घेतली तर तुम्हाला ज्येष्ठ नागरिकांसाठी 9.10 टक्के ते 9.60 टक्के पर्यंत बंपर व्याज ऑफर मिळेल.

इतकेच नाही तर युनिटी स्मॉल फायनान्स बँक 1001 दिवसांच्या एफडीवर सर्वसामान्य नागरिकांना 9 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 9.50 टक्के व्याज दिले जात आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांना सामान्य लोकांच्या तुलनेत 0.5 टक्के अतिरिक्त व्याज मिळते.

त्याचप्रमाणे, Fincare Small Finance Bank मध्ये तुम्हाला 1000 दिवसांच्या FD वर 8.51 टक्के व्याज दिले जात आहे. तर ज्येष्ठ नागरिकांनी या बँकेत एफडी केली तर त्यांना ९.११ टक्के व्याज मिळत आहे.

या स्मॉल फायनान्स बँक एफडी रेटमध्ये, जिथे सामान्य लोकांना 888 दिवसांच्या एफडीवर 8.50 टक्के व्याज मिळते, ज्येष्ठ नागरिकांना त्याच कालावधीसाठी 9 टक्के व्याज मिळत आहे.

ESAF स्मॉल फायनान्स बँकेत गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकांना 3 वर्षांपेक्षा कमी ठेवीच्या कालावधीवर 8.50 टक्के व्याज दिले जात आहे, तर ज्येष्ठ नागरिकांना 9 टक्के दराने व्याज मिळत आहे.

Leave a Comment