Investing Tips : गुंतवणूकदारांनो, लक्षात ठेवा या महत्त्वाच्या गोष्टी, नाहीतर होईल तुमचे आर्थिक नुकसान

Investing Tips : गुंतवणुकीसाठी काही सवयी गरजेच्या आहेत. अशा काही तीन सवयी आहेत, ज्याद्वारे तुम्हाला चांगला नफा मिळवता येईल. तसेच तुम्हाला गुंतवणूक केल्यांनतर कोणताही आर्थिक फटका सहन करावा लागणार नाही. कोणत्या आहेत त्या गोष्टी जाणून घेऊयात सविस्तर माहिती.

गुंतवणुकीत विविधता

गुंतवणुकीसाठी आपला नेहमी पोर्टफोलिओ तयार करा. तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओमध्ये पुरेसे वैविध्य आणावे. गुंतवणूक ही तुमच्या आर्थिक उद्दिष्टांशी सुसंगत असून दीर्घकालीन उद्दिष्टांसाठी तुम्ही इक्विटी मालमत्तांमध्ये जास्त गुंतवणूक करणे गरजेचे आहे. अल्प-मुदतीच्या उद्दिष्टांसाठी, तुम्ही निश्चित उत्पन्न मालमत्तेवर लक्ष केंद्रित करावे. तुमच्या प्रोफाईलला अनुकूल असा पोर्टफोलिओ तयार करण्यासाठी व्यावसायिकांची मदत करा.

करा नियमित गुंतवणूक

सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे तुमच्या कमाईची बचत आणि गुंतवणूक ही चांगली सवय आहे. पण हे लक्षात ठेवा की गुंतवणूक नियमित असावी, तरच गुंतवणुकीतून चांगला नफा मिळेल. गुंतवणुकीसाठी, तुम्हाला पैसे कुठे गुंतवायचे आहेत ते पाहावे लागणार आहे. अशा वेळी, कोणतीही अंतिम मुदत टाळण्यासाठी, आगाऊ चांगली गुंतवणूक करणे केव्हाही चांगले. गुंतवणुकीसाठी तुमच्या खात्यातून आपोआप हस्तांतरित करण्यासाठी पूर्वनिश्चित रक्कम सेट करा. अशा वेळी नियमित गुंतवणूक करता येते.

भावनांवर ठेवा नियंत्रण

माणूस हा खूप भावनिक असतो. अनेकवेळा भावनेमुळे तो अनेक चुकीचे निर्णय घेतो. बाजारातील चढ-उतारामुळे भीती आणि लोभ निर्माण होतो, अशा वेळी बाजारातील चढ-उतार पाहून अनेकजण भावनेने निर्णय घेतात. त्यामुळे तुम्हाला नुकसानही सहन करावे लागेल.

Leave a Comment