Interview Tips : कोणतीही नोकरी मिळविण्यासाठी उमेदवारांना कंपनीच्या नियमानुसार लेखी परीक्षा आणि मुलाखत (Interview Tips) देणे आवश्यक आहे. अशा काही कंपन्या आहेत जिथे उमेदवारांना थेट मुलाखतीसाठी बोलावले जाते. मात्र, मुलाखतीदरम्यान अनेक वेळा उमेदवाराला योग्य पात्रता आणि पुरेसा कामाचा अनुभव असूनही नोकरी मिळत नाही, अशी परिस्थिती दिसून येते. मुलाखतीच्या फेरीत ते नापास होतात. जॉब मिळता मिळता राहून जातो. यामागे अनेक कारणे असू शकतात. अशा परिस्थितीत आज आम्ही अशाच काही कारणांबद्दल सांगणार आहोत.
आत्मविश्वास असणे ही चांगली गोष्ट आहे पण अतिआत्मविश्वास असणे अजिबात चांगले नाही. बर्याच वेळा असे दिसून येते की उमेदवारांना वाटते की त्यांच्याकडे नोकरीशी संबंधित संपूर्ण माहिती आहे. त्यांच्याकडून कोणतीही चूक होऊ शकत नाही. ते कोणतीही चूक करू शकत नाहीत. या उत्साहामुळे त्यांच्याकडून अनेक वेळा चुका होतात. म्हणून काही गोष्टी काळजीपूर्वक लक्षात ठेवा.
कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देताना आपले मत तथ्यांसह मांडा. प्रश्नाचे उत्तर माहिती नसेल कोड्यात बोलणे शक्यतो टाळा. असे केल्याने तुमची नकारात्मक प्रतिमा तयार होणार नाही. जर तुम्हाला माहित नसलेला कोणताही प्रश्न असेल तर फक्त नाही म्हणा आणि पुढे जा.
जेव्हा तुम्ही तुमची उत्तरे द्याल तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही मुलाखत घेणाऱ्याच्या डोळ्यांकडे पाहून बोला. कारण, प्रश्नाचेच उत्तर देताना तुम्ही इकडे तिकडे पाहत आहात असे मुलाखत घेणाऱ्याला वाटायला नको.
अनेक वेळा उमेदवार असे करतात. ही सर्वात सामान्य चुकांपैकी एक आहे. यामुळे तुमच्यातील आत्मविश्वासाची कमतरता देखील दिसून येते. त्यामुळे ते टाळा. यासोबतच देहबोलीचीही काळजी घ्या.
सर्वात शेवटी तुमच्या जुन्या कंपनीबद्दल वाईट बोलू नका. नवीन नोकरी मिळवण्याच्या प्रयत्नात असताना तुम्ही जुन्या कंपनीबद्दल आणि तिथल्या लोकांबद्दल असे काही बोलता, जे तुमच्यासाठी सध्या अडचणीचे ठरू शकते. त्यामुळे ते टाळा.