US-China Tension : अमेरिकेच्या पहिल्या महिला उपराष्ट्रपती कमला हॅरिसने जर्मनीच्या सुरक्षा परिषदेत (US China Tension) चीनला इशारा दिला आणि रविवारी परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन यांनी चीनचे (China) परराष्ट्र मंत्री वांग यी यांना समोरासमोर संभाषणात इशारा दिला. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री ब्लिंकन म्हणाले की, चीनने युक्रेन युद्धात (Ukraine War) मदत करणारी कोणतीही सामग्री रशियाला (Russia) दिली तर त्याचे गंभीर परिणाम होतील.
चीन रशियाला शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा पुरवू शकतो, अशी भीती अमेरिकेला वाटत आहे. जागतिक सुरक्षा शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर एका गुप्त ठिकाणी द्विपक्षीय चर्चेसाठी जगातील दोन मोठ्या अर्थव्यवस्थांच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट झाली. अमेरिकेत चिनी गुप्तहेर बलून पाडल्याच्या घटनेवरून निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांची भेट झाली.
- Gold Investment साठी ‘हे’ आहेत खास पर्याय; काळजी नको, मिळेल चांगला नफा
- IPL 2023 : सर्वाधिक षटकार ठोकणारा फलंदाज कोण ? ; रोहित शर्मा नाही तर..
- IND vs PAK : क्रिकेट चाहत्यांची घोर निराशा; पाकिस्तान संघाने घेतला ‘हा’ निर्णय
- PM-SHRI Scheme : शाळा होणार मॉडेल; ‘त्यासाठी’ मोदी सरकारने 9 हजार शाळा केल्या सिलेक्ट
- PF Balance : कंपनी तुमच्या खात्यात पीएफचे पैसे टाकते का ? ; ‘या’ सोप्या पद्धतींनी मिळवा माहिती
या महिन्यात, ब्लिंकेनने बलून प्रकरणामुळे बीजिंगची त्यांची भेट पुढे ढकलली. आता रशियाला लष्करी साहित्य पुरवण्याच्या भीतीने अमेरिका आणि चीन यांच्यातील संबंधात कटुता वाढली आहे. ब्लिंकेन म्हणाले की, रशियाला लष्करी साहित्य पुरवण्याच्या चीनच्या विचाराने अमेरिकेची चिंता वाढली आहे. चीनने असे केल्यास अमेरिका आणि चीनमधील संबंधांवर गंभीर परिणाम होतील.
ब्लिंकेन म्हणाले की, युद्धात उपयोगी पडणाऱ्या अनेक प्राणघातक वस्तू चीनकडून रशियाला गुप्तपणे पुरवल्या जात आहेत. चीन आता या वस्तू, शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा मोठ्या प्रमाणात पुरवण्याचा विचार करत आहे. असे झाले तर परिस्थिती आणखी बिकट होईल.
याला उत्तर देताना वांग यी म्हणाले की, दोन्ही देशांमधील बिघडलेले संबंध सुधारण्याची जबाबदारी अमेरिकेची आहे. चीनशी संबंधित बाबींमध्ये अमेरिकेकडून सातत्याने बळाचा वापर केल्याने दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये ही घसरण झाली आहे. चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी या संदर्भात अलीकडेच अमेरिकेच्या हवाई दलाने पाडलेल्या चिनी बलूनचे उदाहरण दिले.
ते म्हणाले की, हा फुगा हवामानाच्या माहितीसाठी उडवण्यात आला होता, जो मार्ग चुकला आणि अमेरिकेच्या आकाशात पोहोचला. त्यावर अमेरिकेने अतिप्रक्रिया केली.