Pakistan : आर्थिक संकटात सापडलेल्या पाकिस्तानसाठी (Pakistan) सध्या दिलासा देणारी परिस्थिती राहिलेली नाही. आता देशाच्या आरोग्य व्यवस्थेवरही खराब आर्थिक परिस्थितीचा परिणाम होत आहे. येथील रुग्णालये अत्यावश्यक औषधांच्या (Medicines Shortage in Hospitals) टंचाईने हैराण झाले आहेत. डॉलरच्या कमतरतेमुळे बहुतांश औषध उत्पादकांना आयात केलेले साहित्य मिळत नाही. पाकिस्तान फार्मास्युटिकल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (PPMA) ने म्हटले आहे, की जर आयातीवरील बंदी आणखी चार ते पाच सप्ताह कायम राहिली तर देशाला सर्वात वाईट वैद्यकीय संकटाचा सामना करावा लागेल.
पाकिस्तानचे वैद्यकीय संकट काय आहे? याचे कारण काय? संकटावर मात करण्यासाठी कोणती पावले उचलली जात आहेत? IMF बेलआउट पॅकेजसाठी पाकिस्तान काय करत आहे ? याबाबत जाणून घेऊया..
- Spotify layoffs चा इतक्या मंडळींना झटका; पहा काय घडले कारण आणि काय म्हटले ceo Daniel यांनी | Bad News
- Israel Hamas War : युद्धविराम संपताच इस्त्रायलचा ‘एअरस्ट्राइक’; पहा, युद्धात काय घडलं?
- Healthy Diet Tips : पोटाची चरबी कमी करायचीय? मग, ‘या’ टिप्स फॉलो करा; 7 दिवसांत फरक नक्कीच!
- Vitamin E for Hair Care : केस गळती वाढली? नो टेन्शन, खोबरेल तेलात मिसळा ‘ही’ वस्तू; केस होतील घनदाट
- Exercise for Sharper Memory : काय, तुमचाही विसराळूपणा वाढलाय? मग, ‘या’ 5 ट्रिक ट्राय कराच
पाकिस्तानचे वैद्यकीय संकट काय आहे?
परकीय चलनाच्या कमतरतेमुळे औषधे आणि आरोग्य उपकरणांच्या आयातीवर परिणाम झाला आहे. औषध उत्पादनासाठी आवश्यक असलेल्या कच्च्या मालाच्या घटत्या आयातीमुळे स्थानिक औषध उत्पादकांना त्यांचे उत्पादन कमी करण्यास भाग पाडले आहे. औषधे आणि वैद्यकीय उपकरणेअभावी डॉक्टरांना शस्त्रक्रिया करता येत नाहीत. त्याचबरोबर अनेक रुग्णालयांमध्ये रुग्ण उपचाराविना पडून आहेत. स्थानिक अहवालांनुसार ऑपरेशन थिएटरमध्ये हृदय, कर्करोग आणि मूत्रपिंड यांसारख्या शस्त्रक्रियांसाठी केवळ दोन आठवड्यांचा भूल देण्याच्या औषधांचा साठा शिल्लक आहे. अशीच स्थिती राहिल्यास पाकिस्तानातील रुग्णालयांतील कर्मचाऱ्यांना नोकरी सोडावी लागेल. काही महत्त्वाच्या औषधांच्या टंचाईचा परिणाम बहुतांश ग्राहकांवर होत असल्याचे किरकोळ विक्रेते सांगतात.
हे संकट किती मोठे आहे?
पाकिस्तानातील 95% औषधी उत्पादन आयातीवर अवलंबून आहे. देशाला भारत (India) आणि चीनसह (China) इतर देशांकडून कच्चा माल लागतो. मात्र डॉलरच्या कमतरतेमुळे कराची बंदरात बहुतांश औषध उत्पादकांना आयात केलेले साहित्य मिळत नाही. दरम्यान, औषध निर्मिती उद्योगाचा दावा आहे की औषध निर्मितीचा खर्च वाढत आहे. इंधनाच्या किमतीत झालेली वाढ, वाहतूक शुल्क आणि पाकिस्तानी रुपयाची प्रचंड घसरण हे त्यामागचे कारण असल्याचे सांगितले जात आहे.
संकटावर मात करण्यासाठी कोणती पावले उचलली जात आहेत ?
सध्याच्या संकटावर मात करण्यासाठी पाकिस्तान मेडिकल असोसिएशनने (PMA) सरकारच्या हस्तक्षेपाची मागणी केली आहे. मात्र, तत्काळ पावले उचलण्याऐवजी अधिकारी किती दिवसांचा साठा शिल्लक ठेवतात याकडे लक्ष देत असल्याचा दावा स्थानिक माध्यमांनी केला आहे. पाकिस्तानच्या पंजाबमधील औषध विक्रेत्यांनी सांगितले की, सरकारी सर्वेक्षण पथकांनी या भागात भेट दिली. पाकिस्तान फार्मास्युटिकल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (PPMA) चे केंद्रीय अध्यक्षांनी सांगितले, की सध्या सुमारे 20-25 टक्के फार्मास्युटिकल उत्पादनात घट होत आहे. ते पुढे म्हणाले, “जर आयातीवर बंदी आणखी चार ते पाच सप्ताह कायम राहिली तर देशाला सर्वात वाईट वैद्यकीय संकटाचा सामना करावा लागेल.”
पुढे ऊर्जा संकट?
आधीच अनेक संकटांचा सामना करत असलेल्या पाकिस्तानला येत्या काही दिवसांत ऊर्जा क्षेत्रात मोठा धक्का बसू शकतो. रात्री 8.30 वाजेपर्यंत सर्व मॉल आणि बाजारपेठा बंद ठेवण्यासह ऊर्जा खर्च वाचविण्यासाठी पाकिस्तान सरकारने मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, वीज प्रकल्पांच्या कर्जासाठी पाकिस्तानचे अधिकारी आयएमएफशी (IMF) चर्चा करत आहेत. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे, की ग्राहकांना वीज दरात आणखी वाढ सहन करण्याची तयारी ठेवावी लागेल. वीज क्षेत्रातील कर्जाची सेवा देण्यासाठी ग्राहकांकडून अतिरिक्त देयके गोळा करण्याशिवाय सरकारकडे पर्याय उरलेला नाही.
IMF बेलआउट पॅकेजसाठी पाकिस्तान काय करत आहे?
संकट टाळण्यासाठी पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून (IMF) बेलआउट पॅकेजची तातडीने गरज आहे. गेल्या महिन्यात आर्थिक पॅकेजसाठी पाकिस्तान आणि IMF अधिकार्यांशी चर्चा काही मतभेदांमुळे खंडित झाली होती. आता सरकारने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने ठरवून दिलेल्या आणखी एका अटीची पूर्तता करण्यासाठी धोरणात्मक व्याजदरात दोन टक्क्यांनी (17 आधार गुण) वाढ करण्याचे मान्य केले आहे.
एका अहवालात म्हटले आहे, की नवीन निर्णयासह पाकिस्तानने US$ 6.5 अब्ज बेलआउट पॅकेजचा भाग म्हणून US$ 1.1 अब्ज डॉलर्सच्या महत्त्वपूर्ण निधीमध्ये प्रवेश करण्यासाठी IMF ची आणखी एक पूर्वअट स्वीकारली आहे. त्यात पुढे असेही म्हटले आहे की, पाकिस्तानने देशांतर्गत कर्ज उभारण्यासाठी सरकारने लिलावात ठरवलेल्या दरांवर आधारित व्याजदरात वाढ करण्याची घोषणा केली आहे. पाकिस्तानी अधिकाऱ्यांच्या या निर्णयामुळे व्याजदर 19 टक्क्यांपर्यंत वाढेल, जो ऑक्टोबरमधील आधीच्या 19.5 टक्क्यांपेक्षा कमी आहे.