मेडिसिन्स सॅन्स फ्रंटियर्स (MSF) या मोफत वैद्यकीय मदत संस्थेच्या 14 ट्रकच्या ताफ्याने सीरियाच्या भूकंपग्रस्त (Syria Earthquake) वायव्य भागात प्रवेश केला आहे. 6 फेब्रुवारी रोजी या क्षेत्राला विनाशकारी भूकंपाचा धक्का बसला आणि त्यात मोठ्या प्रमाणात जीवित आणि मालमत्तेची हानी झाली. बाहेरून आलेल्या बचाव आणि मदत पथकांना बंडखोरांच्या ताब्यातील भागात प्रवेश दिला जात नव्हता. एमएसएफने बाधित भागात आपल्या ताफ्याच्या प्रवेशाची माहिती दिली आहे.
अडीच कोटी लोकांना वैद्यकीय मदतीची आवश्यकता आहे
दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे की तुर्की आणि सीरियामधील अडीच कोटी लोकांना विविध प्रकारच्या वैद्यकीय सेवेची गरज आहे. याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. युनायटेड नेशन्सच्या (united Nations) जागतिक अन्न कार्यक्रमाने (WFP) भूकंपग्रस्त सीरियामध्ये (Syria Earthquake) दुष्काळ आणि साथीच्या रोगांचा अंदाज वर्तवला आहे. बाहेरून मदत न मिळाल्याने परिसरातील ढिगाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात मृतदेह गाडले गेले असून बेघर लोकांसाठी अन्न व वैद्यकीय सुविधा नाही. अशा स्थितीत तेथे दुर्घटनेची शक्यता निर्माण झाली आहे.
- IND vs PAK : क्रिकेट चाहत्यांची घोर निराशा; पाकिस्तान संघाने घेतला ‘हा’ निर्णय
- PM-SHRI Scheme : शाळा होणार मॉडेल; ‘त्यासाठी’ मोदी सरकारने 9 हजार शाळा केल्या सिलेक्ट
- PF Balance : कंपनी तुमच्या खात्यात पीएफचे पैसे टाकते का ? ; ‘या’ सोप्या पद्धतींनी मिळवा माहिती
- Railway Fuel Pump : कुठे असतात रेल्वेचे पेट्रोल पंप ?, कसे भरतात इंधन ?, किती मिळतो मायलेज ?; वाचा..
- TV Viewing Distance : टीव्ही किती अंतरावरून पहावा ? ; तुम्ही ‘ही’ चूक तर करत नाही ना, जाणून घ्या..
डब्ल्यूएफपी अलर्टनंतर एमएसएफ वैद्यकीय संघांना बंडखोरांच्या ताब्यात असलेल्या प्रदेशात परवानगी देण्यात आली आहे. टीममधील डॉक्टर उपचारासोबत औषधे देतील आणि गरज पडल्यास ऑपरेशनही करतील. डब्ल्यूएफपीचे संचालक डेव्हिड बीसले म्हणाले की, सीरियन आणि तुर्की सरकार पूर्ण सहकार्य करत आहेत. परिस्थिती सुधारण्यासाठी प्रभावी पावले उचलली जात आहेत
तुर्कीने बचाव कार्य पूर्ण झाल्याची घोषणा केली
भूकंपानंतर (Turkiye Earthquake) १२ दिवसांनी ढिगार्यातून लोकांना जिवंत बाहेर काढण्यात आल्याचे वृत्त असून तुर्की सरकारने रविवारी बचावकार्य संपल्याची घोषणा केली. आता ढिगारा हटवून त्यांच्या जागी इमारती नव्याने बांधण्याचे काम होणार आहे. अजूनही अनेक लोक ढिगाऱ्याखाली दबले असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. भूकंपानंतर दोन आठवड्यांनंतर यातील बहुतांश लोकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. पण काही कुटुंबांनी अजूनही आशा सोडलेली नाही. दररोज ते ढिगाऱ्याखालच्या इमारतींच्या जवळ जाऊन ढिगारा हटवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि बेपत्ता झालेल्यांची नावे मोठ्या आवाजात सांगत आहेत. दरम्यान, अमेरिकेचे (America) परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लँकेन हे तुर्कस्तानला पोहोचले असून ते तिथल्या सरकारशी चर्चा करत आहेत आणि मदतीसाठी आराखडा तयार करत आहेत.