Insurance Claim : विमा कंपन्या काही वेळा किरकोळ कारणांमुळे सामान्य लोकांचे विमा दावे (Insurance Claim) नाकारतात. या कारणामुळे अनेकांना आपली संपूर्ण बचत खर्च करावी लागते. त्याच वेळी लोकांना गरजेच्या वेळी आर्थिक मदत मिळू शकत नाही परंतु, जर एखाद्या कंपनीने (Insurance Company) एखाद्या व्यक्तीचा दावा नाकारला तर तो त्याबद्दल सरकारी संस्था आणि विमा नियामकाकडे तक्रार करू शकतो.
विम्याचा दावा नाकारल्याबद्दल तक्रार कशी आणि कुठे करता येईल?
असे अनेक व्यासपीठ सरकारने उपलब्ध करून दिले आहेत. जिथे तुम्ही विम्याचा दावा नाकारल्याबद्दल सहज तक्रार करू शकता आणि तुमची समस्या मांडू शकता. यासाठी तुम्ही भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (IRDAI) च्या ‘बिमा भरोसा सिस्टम’ (Bima Bharosa System) या ऑनलाइन विमा तक्रार पोर्टलवर थेट तक्रार करू शकता. याशिवाय, तुम्ही IRDAI च्या ईमेल आयडी [email protected] वर देखील तक्रार पाठवू शकता. तुम्ही टोल-फ्री क्रमांकांवर विमा कंपनीविरुद्ध तक्रार देखील करू शकता. याशिवाय, तुम्ही थेट विमा लोकपालाकडे तक्रार करू शकता. तथापि, येथे अट अशी आहे की विमा नाकारल्याच्या एक वर्षाच्या आत तुम्हाला विमा लोकपालकडे तक्रार दाखल करावी लागेल.
विमा लोकपालाकडे तक्रार कशी करू शकता?
तुम्ही ऑनलाइन किंवा ऑफलाइन जाऊन विमा लोकपालकडे सहजपणे तक्रार नोंदवू शकता. ऑनलाइन तक्रार नोंदवण्यासाठी तुम्हाला www.cioins.co.in वर लॉग इन करावे लागेल. विमा लोकपालकडे तक्रार नोंदवण्यासाठी ही अधिकृत वेबसाइट आहे. याशिवाय, तुम्ही तुमच्या जवळच्या विमा लोकपाल कार्यालयात जाऊन तक्रार नोंदवू शकता.