अहमदनगर : दक्षिण भारतीय खाद्य पदार्थ केवळ दक्षिण भारतात लोकप्रिय आहेत असे नाही तर आता या खाद्यपदार्थांना जगभरात ओळख मिळाली आहे. देशभरातही हे पदार्थ विशेष प्रसिद्ध आहेत. दक्षिणेत मिळणारे पदार्थ स्वादिष्ट तर असतातच पण आरोग्यासाठीही खूप फायदेशीर असतात. या पदार्थांसोबत नारळाच्या चटणीचे कॉम्बिनेशन अप्रतिम आहे. तुम्हालाही रोजचा साधा नाश्ता करण्याचा कंटाळा येत असेल तर आज आम्ही तुमच्यासाठी दक्षिणेतील एक स्वादिष्ट आणि पौष्टिक पदार्थ घेऊन आलो आहोत. जे अगदीच स्वादिष्ट आहेत, आणि तयार करायलाही सोपे आहेत. तुमच्यासाठी रवा उत्तपम रेसिपी घेऊन आलो आहोत.
साहित्य- रवा 1 कप, दही 1/2 कप, चवीनुसार मीठ, बारीक केलेले अद्रक 2 चमचे, कढीपत्ता 2 चमचे, बारीक केलेली हिरवी मिरची 2 चमचे, पाणी 1 कप, आवश्यकतेनुसार तेल, बारीक केलेला कांदा 1 चमचा, बारीक केलेला टोमॅटो 1 चमचा, कोथिंबीर 1 चमचा, बारीक केलेली शिमला मिरची 1 चमचा.
रेसिपी
पीठ तयार करण्यासाठी रवा, दही, मीठ, अद्रक, कढीपत्ता, हिरवी मिरची आणि पाणी एकत्र मिसळून घ्या. त्यानंतर 10 मिनिटे बाजूला ठेवा. उरलेले पीठ खूप घट्ट झाल्यावर थोडे पाणी टाकून हलके मिक्स करा. उत्तपम बनवण्यासाठी जाड कंसिस्टन्सी पिठाची गरज आहे. तवा गरम करून त्यात थोडे तेल किंवा बटर टाका. त्यानंतर पीठा टाका आणि एक मिनिट शिजू द्या. वरून कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, सिमला मिरची आणि चिमूटभर मीठ पसरवा. वर थोडे तेल शिंपडा आणि शिजल्यावर उत्तपम उलटा. दोन्ही बाजूंनी तपकिरी होईपर्यंत भाजून घ्या आणि नंतर तव्यावरुन काढून घ्या. अशा पद्धतीने तुम्ही अगदी काही वेळात साऊथ इंडियन स्टाइल रवा उत्तपम तयार करू शकता.
वेगळे काहीतरी : पोहा पराठाही आहे एकदम टेस्टी.. ‘या’ रेसिपीने होईल काही मिनिटात तयार..