मुंबई : सध्या दिवसेंदिवस देशात महागाई वाढू लागल्याने सर्वसामान्यांना मोठा फटका बसताना दिसतो आहे. पेट्रोल-डिझेलसह जीवनाश्यक वस्तूंच्या किंमतीही मोठ्या प्रमाणात वाढल्याने महागाईच्या झळांनी नागरिक हैराण झाले आहेत. विशेष म्हणजे, खुद्द केंद्र सरकारनंही महागाई वाढल्याची एकप्रकारे कबुली दिलीय.. मोदी सरकारनं मार्च महिन्याची महागाईच्या दराच्या सरासरीची आकडेवारीतून ही बाब स्पष्टपणे समोर आली आहे..
सरकारी आकडेवारीनुसार, फेब्रुवारीच्या तुलनेत मार्च महिन्यात महागाई वाढल्याचं दिसतं. या आकडेवारीनुसार मार्चमध्ये महागाईचा दर हा 6.95 टक्के झाला आहे. किरकोळ महागाईचा दर हा जानेवारीमध्ये 6.01 टक्के, तर फेब्रुवारीमध्ये महागाईचा हाच दर 6.07 टक्के होता. फेब्रुवारीच्या तुलनेत मार्चमध्ये 0.88 टक्क्यांनी महागाई वाढल्याचं दिसतं..
गेल्या एका महिन्यापासून पेट्रोल-डिझेलच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत आहे. आता सरकारी आकडेवारीच समोर आल्याने जनतेला दिलासा मिळणार नसल्याचे स्पष्ट झालंय. देशभरातील जनतेला महागाईचा फटका बसणार आहे. खाद्यतेल, इंधन, जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किंमतीमुळे सामान्यांच्या खिशाला कात्री बसणार आहे. विविध रिपोर्टनुसार, महागाईचा टक्का वाढणार असल्याचं बोललं जात होतं. त्यानुसार सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशातील महागाई 6.95 टक्क्यापर्यंत वाढल्याचं दिसतंय.
किरकोळ महागाईचा दर कसे ठरवले जाते ?
किरकोळ महागाई मोजण्यासाठी, कच्च्या तेलासह वस्तूंच्या किमती, त्याच्या उत्पादनाचा खर्च अशा जवळपास 299 वस्तू आहेत, ज्यांच्या किंमतीच्या आधारावर किरकोळ महागाईचा दर ठरवण्यात येतो..
खुशखबर, नोकर भरतीबाबत ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, तरुणांचा होणार फायदा..
भारतात लवकरच धावणार बुलेट ट्रेन; मोदींचा ‘तो’ स्वप्न होणार साकार