Inflation : नवी दिल्ली : जगभरातील वाढत्या महागाईमुळे (Inflation) लोक काळजीत आहेत आणि वार्षिक चलनवाढीचा दर असामान्यपणे जास्त पातळीवर आहे (85 टक्क्यांपर्यंत). महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी आरबीआयसह (RBI) इतर देशांच्या केंद्रीय बँका आक्रमकपणे व्याजदर वाढवत आहेत. यूएस फेडरल रिजर्व्हने बुधवारी व्याजदरात 0.75 टक्क्यांनी वाढ केली. यावर्षी व्याजदरात झालेली ही सहावी वाढ होती.
वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सने (World of Statistics) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, तुर्की (Turkey) आणि अर्जेंटिना (Argentina) या देशांचा वार्षिक चलनवाढीचा दर 83 टक्क्यांहून अधिक आहे. तुर्कीमधील महागाई (Inflation in Turkey) 85.51 टक्के आहे, जे 24 वर्षांतील सर्वाधिक आहे. जास्त चलनवाढ असूनही केंद्रीय बँक आपल्या धोरणात्मक दरांमध्ये कपात करत आहे.
वाढत्या महागाईच्या बाबतीत तुर्कीनंतर अर्जेंटिना हा देश आहे. जिथे सध्या महागाईचा दर 83 टक्के आहे. रशिया (13.7 टक्के), इटली (11.9 टक्के), जर्मनी (10.4 टक्के), यूके (10.1 टक्के), अमेरिका (8.2 टक्के) आणि दक्षिण आफ्रिकेत महागाई दर (7.5 टक्के) आहे. सध्या भारतात महागाईचा दर (Inflation in India) 7.4 टक्के आहे. त्यापाठोपाठ ऑस्ट्रेलिया 7.3 टक्के, ब्राझील (7.1 टक्के), कॅनडा (6.9 टक्के), फ्रान्स (6.2 टक्के), इंडोनेशिया (5.9 टक्के), दक्षिण कोरिया (5.6 टक्के), सौदी अरेबिया (3.1 टक्के), जपान (3 टक्के) होते. टक्के) आणि चीनमध्ये महागाई दर (2.8 टक्के) आहे.
गेल्या नऊ महिन्यांपासून भारतातील चलनवाढ भारतीय रिजर्व्ह बँकेच्या 4 टक्के लक्ष्यापेक्षा सातत्याने जास्त असली तरी, इतर प्रमुख जागतिक अर्थव्यवस्थांच्या तुलनेत भारतातील किमतीतील वाढीचा दर कमी आहे. यामध्ये अमेरिका, ब्रिटन, रशिया, जर्मनी, तुर्की, दक्षिण आफ्रिका आणि इटली यांचा समावेश आहे.
त्याच वेळी, 3 नोव्हेंबर रोजी आरबीआयने महागाईच्या मुद्द्यावर महत्त्वपूर्ण बैठक घेतली. एक निवेदन जारी करताना, मध्यवर्ती बँकेने म्हटले आहे, की 3 नोव्हेंबर 2022 रोजी चलनविषयक धोरण समितीची एक वेगळी बैठक झाली, ज्यामध्ये अहवालावर चर्चा करण्यात आली. जगभरातील महागाईचा जास्त दर जागतिक पातळीवर केंद्रीय बँकांना कठोर आर्थिक धोरण निवडण्यास भाग पाडत आहे आणि वाढत्या व्याजदरांचा अर्थव्यवस्थेवर परिणाम होत आहे. क्रिसिलने आपल्या ताज्या अहवालात म्हटले आहे, की जर केंद्रीय बँकांनी महागाई नियंत्रित करण्यासाठी आक्रमकपणे व्याजदर वाढवले तर सर्व देशांच्या आर्थिक घडामोडींमध्ये तीव्र घट टाळणे कठीण होईल.
- Read : Inflation : ‘त्या’ संकटाने श्रीमंत देशांत उडालाय हाहाकार; पहा, कशामुळे आहेत लोक हैराण
- RBI चा झटका ग्राहकांनाही..! पहा कसा परिणाम होणार बंद केलेल्या बँकांच्या ग्राहकांवर