Infinix Smart 8 Plus : एका बड्या टेक कंपनीने आपला नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. जो तुम्ही खूप कमी किमतीत खरेदी करू शकता. यात कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी 6000mAh बॅटरी आणि 50MP कॅमेरा दिला आहे. पहा संपूर्ण ऑफर.
तुम्हाला एक्सचेंज ऑफरमध्ये 1,000 रुपयांच्या स्वस्तात खरेदी करता येईल. Infinix या नवीन फोनमध्ये 6000mAh बॅटरीसह अनेक उत्कृष्ट फीचर्स देत असून फोन तीन रंगांच्या पर्यायांमध्ये येतो – Galaxy White, Shiny Gold आणि Timber Black कलर.
फीचर्स
कंपनीच्या या फोनमध्ये 1612×720 पिक्सेल रिझोल्यूशनसह HD+ डिस्प्ले मिळत असून हा डिस्प्ले 90Hz च्या रीफ्रेश दर आणि 180Hz च्या टच सॅम्पलिंग रेटसह येईल. कंपनीच्या फोनमध्ये दिलेला हा डिस्प्ले 500 nits च्या पीक ब्राइटनेस लेव्हलला सपोर्ट करेल.
स्टोरेजचा विचार केला तर फोन 4 GB LPDDR4x रॅम आणि 128 GB eMMC 5.1 स्टोरेजसह सुसज्ज आहे. याची खास गोष्ट म्हणजे या फोनमध्ये तुम्हाला 4 GB व्हर्चुअल रॅम पाहायला मिळेल. यासह, या स्मार्टफोनची एकूण रॅम 8 GB पर्यंत वाढेल.
ग्राहकांना मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने फोनची मेमरी 2 टीबी पर्यंत वाढवता येईल. तसेच प्रोसेसर म्हणून कंपनी या फोनमध्ये MediaTek Helio G36 चिपसेट मिळत असून फोटोग्राफीसाठी, फोनमध्ये क्वाड एलईडी रिंग फ्लॅश आणि एआय लेन्ससह 50-मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा आहे.
तर सेल्फीसाठी, एलईडी फ्लॅशसह 8 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा असणार आहे. साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर असलेल्या या फोनमध्ये 6000mAh बॅटरी असून ती 18 वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
बायोमेट्रिक सुरक्षिततेसाठी, यात साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर दिला असून याच्या OS बद्दल बोलायचे झाले तर हा फोन Android 13 Go Edition वर आधारित XOS 13 वर काम करेल. तर कनेक्टिव्हिटीसाठी, या फोनमध्ये तुम्हाला Dual 4G VoLTE, Wi-Fi 802.11 ac, Bluetooth 5.0, GPS आणि USB Type-C पोर्ट सारखे पर्याय मिळेल.