Infinix Note 40 : लवकरच लाँच होणार 108MP कॅमेरा असणारा 5G फोन, जाणून घ्या किमतीसह फीचर्स

Infinix Note 40 : बाजारात आता लवकरच Infinix Note 40 आपला फोन लाँच करणार आहे. कंपनी यात 108MP कॅमेरा देणार आहे. जर तुम्ही नवीन फोन खरेदी करणार असाल तर जरा थांबा. कारण लवकरच हा फोन बाजारात येईल. जाणून घ्या किमतीसह फीचर्स.

रिपोर्टनुसार MobilTelefon ने Infinix Note 40 आणि Infinix Note 40 Pro चे काही स्पेसिफिकेशन्स शेअर करण्यात आले आहेत. याशिवाय या फोनची संभाव्य किंमतही समोर आली आहे. किमतीचा विचार केला तर 8GB रॅम आणि 256GB सह बेस वेरिएंटसाठी स्टँडर्ड Infinix Note 40 ची किंमत 26,990 रुपये असण्याची शक्यता आहे. कंपनीच्या या फोनमध्ये MediaTek Helio G91 प्रोसेसर आहे. पण इतर फीचर्स समोर आले नाहीत.

जाणून घ्या तपशील

Infinix Note 40 Pro, लाइनअपचे प्रो मॉडेल, मध्ये 6.78-इंचाचा डिस्प्ले असणार आहे. जो उच्च-रिफ्रेश रेट सपोर्टसह AMOLED डिस्प्ले असून फोन 8GB रॅम आणि 256GB स्टोरेजसह MediaTek Helio G99 प्रोसेसरने सुसज्ज असणार आहे. फोनमध्ये 108MP+2MP+2MP ट्रिपल कॅमेरा सेन्सर डिव्हाइसच्या मागील पॅनलवर पाहायला मिळेल. रिपोर्टनुसार, या फोनची किंमत 29,990 रुपये असण्याची शक्यता आहे.

Infinix Note 40 मध्ये 5000mAh बॅटरी असणार आहे. मानक आणि प्रो मॉडेल्समध्ये अनुक्रमे 45W आणि 70W जलद चार्जिंग समर्थित असणार आहे. Google Play Console सूचीमध्ये देखील, Infinix Note 40 Pro मॉडेल फुल HD + डिस्प्ले, MediaTek Dimensity 7020 प्रोसेसर आणि 8GB RAM सह दर्शविले असून फोनला Android 14 वर आधारित सॉफ्टवेअर स्किन मिळेल.

Infinix Note 40 Pro+ 5G या लाइनअपच्या शक्तिशाली मॉडेलचे सर्वात मोठे फिचर म्हणजे या फोनमध्ये उपलब्ध 100W जलद चार्जिंग आहे. वायरलेस मॅग्नेटिक चार्जिंग असणारा हा पहिला अँड्रॉइड फोन असेल असा दावा करण्यात येत आहे. त्यामुळे लवकरात लवकर हा फोन खरेदी करा.

Leave a Comment