Infinix GT 10 Pro : भारतीय बाजारपेठेमध्ये येत्या काही दिवसात स्मार्टफोन कंपनी Infinix नवीन स्मार्टफोन लॉन्च करणार आहे.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार 3 ऑगस्ट रोजी कंपनी भारतीय बाजारपेठेमध्ये Infinix GT 10 Pro लॉन्च करणार आहे.
Infinix GT 10 Pro आणि Infinix GT 10 Pro+ या सिरीजमध्ये समाविष्ट होण्याची अपेक्षा आहे. Infinix ने पुष्टी केली आहे की Infinix GT 10 Pro भारतात 3 ऑगस्ट रोजी लॉन्च होईल.
Infinix GT 10 सिरीज अपेक्षित फीचर्स
फोनमध्ये 120Hz च्या रिफ्रेश रेटसह AMOLED डिस्प्ले असल्याची पुष्टी देखील केली गेली आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फोनमध्ये फोटोग्राफीसाठी 108-मेगापिक्सलचा प्राइमरी सेन्सर दिला जाऊ शकतो. याशिवाय, दोन 8-मेगापिक्सेल सेन्सर असतील. लीक झालेल्या अहवालांवर विश्वास ठेवला तर, GT 10 Pro इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरने सुसज्ज असेल. MediaTek Dimensity 1300 SoC चिप फोनमध्ये प्रोसेसर म्हणून वापरली जाऊ शकते. याशिवाय हँडसेटमध्ये पॉवर बॅकअपसाठी 5,000mAh बॅटरी दिली जाऊ शकते.
हा स्मार्टफोन Android 13 वर आधारित XOS 13 बूटसह येण्याची अपेक्षा आहे. आधीच्या अहवालानुसार, डिस्प्ले फुल-एचडी+ रिझोल्यूशन ऑफर करण्याची शक्यता आहे. फोनमध्ये सेल्फी प्रेमींसाठी 32-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो. लॉन्चच्या दिवशी, GT 10 Pro प्री-बुकिंगसाठी उपलब्ध असेल आणि पहिल्या 5,000 ग्राहकांना प्रो गेमिंग किट प्राप्त करण्याची संधी मिळेल.
Infinix GT 10 सिरीज भारतातील उपलब्धता
फोनची किंमत 20 हजार रुपयांपेक्षा कमी असू शकते. लॉन्च केल्यानंतर तुम्ही फ्लिपकार्टच्या वेबसाइटवरून हा दमदार फोन खरेदी करू शकतात.