Infinix GT 10 Pro : परवडणाऱ्या किमतीमध्ये जर तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खास ठरणार आहे.
आम्ही तुम्हाला सांगतो बाजारात सध्या एक फाडू ऑफर जाहीर करण्यात आली आहे. ज्याचा फायदा घेत तुम्ही आता तब्बल 19 हजारांच्या बचतीसह नवीन स्मार्टफोन घरी घेऊन जाऊ शकतात.
तुमच्या माहितीसाठी जाणुन घ्या लोकप्रिय ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर Infinix GT 10 Pro पहिल्या सेलसाठी लिस्टिंग करण्यात आला आहे. ज्याचा तूम्ही फायदा घेत कमी किमतीमध्ये हा फोन घरी आणू शकतात.
या फोनमध्ये तुम्हाला 5000mAh बॅटरी, 45W फास्ट चार्जिंग सपोर्ट, 108-मेगापिक्सलचा मेन कॅमेरा आणि Mediatek Dimensity 8050 प्रोसेसर मिळणार आहे.
Infinix GT 10 Pro किंमत आणि ऑफर
तुमच्या माहितीसाठी जाणुन घ्या स्मार्टफोनची किंमत 19,999 रुपये आहे. हा स्मार्टफोन सायबर ब्लॅक आणि मिराज सिल्व्हर या दोन कलर व्हेरियंटसह येतो.
जर आपण मिळालेल्या ऑफर्सबद्दल बोललो तर ते खरेदी करताना तुम्ही ICICI बँक किंवा कोटक बँक कार्ड वापरल्यास, तुम्हाला 2,000 रुपयांपर्यंत सूट मिळेल.
तुम्हाला Flipkart Axis Bank कार्डवर 5% अमर्यादित कॅशबॅक देखील मिळेल. तुम्ही दरमहा ₹704 EMI ऑफर अंतर्गत फोन देखील खरेदी करू शकता.
तर दुसरीकडे या फोनवर 19,350 पर्यंतच्या एक्सचेंज बोनस मिळत आहे ज्याचा फायदा घेत तुम्ही हा फोन स्वस्तात घरी आणू शकतात.
हे लक्षात घ्या की तुमच्या जुन्या फोनची स्थिती चांगली असेल आणि मॉडेल देखील नवीनतम असेल तेव्हाच तुम्हाला ही सूट मिळेल.
Infinix GT 10 Pro फीचर्स
Infinix GT 10 Pro मध्ये FHD+ रिझोल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेटसह 6.67-इंच AMOLED स्क्रीन आहे. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये 108-मेगापिक्सलचा मेन सेन्सर आणि 2-मेगापिक्सेल डेप्थ आणि 2-मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर आहे. तर सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 32-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
GT 10 Pro मध्ये डायमेंसिटी 8050 चिपसेट प्रोसेसर म्हणून वापरण्यात आला आहे. यात 8 GB LDPDR4x रॅम आणि 256 GB स्टोरेज आहे. याशिवाय फोनमध्ये 45W फास्ट चार्जिंगसह 5,000mAh बॅटरी आहे. GT-आधारित Android 13 साठी XOS वर चालते.