Indigo Flight: मोठी बातमी! फ्लाइटमध्ये बॉम्ब असल्याचा दावा; करण्यात आली इमर्जन्सी लँडिंग

Indigo Flight : चेन्नईहून मुंबईला येणा-या इंडिगोच्या बॉम्ब असल्याचा दावा मंगळवारी रात्री करण्यात आला. यामुळे एकच खळबळ उडाली होती.

माहितीनुसार, चेन्नईहून मुंबईला येणा-या इंडिगो विमानाला मंगळवारी बॉम्बचा धमकीचा मेसेज मिळाला. यानंतर विमानाची इमर्जन्सी लँडिंग करण्यात आली.मुंबई विमानतळावरील सूत्राने ही माहिती दिली.

सूत्राने सांगितले की, नवी दिल्लीतील खासगी विमान कंपनीच्या कॉल सेंटरला बॉम्बचा धमकीचा मेसेज आला होता. त्यानंतर रात्री 10:30 वाजता विमान मुंबई विमानतळावर सुरक्षितपणे उतरल्याचे त्यांनी सांगितले.

एअरलाइनने एका निवेदनात म्हटले आहे की, ‘चेन्नईहून मुंबईला जाणाऱ्या इंडिगो फ्लाइट 6E5149 मध्ये बॉम्बची असल्याची धमकी मिळाली होती. विमान मुंबईत उतरल्यानंतर क्रूने प्रोटोकॉलचे पालन केले आणि विमानतळावरील दुर्गम ठिकाणी नेण्यात आले. इंडिगोने सांगितले की, सर्व प्रवासी विमानातून सुखरूप उतरले आहेत.

Leave a Comment