Indian Railways : रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव (Railway Minister Ashwini Vaishnaw) यांनी अहमदाबाद (Ahmedabad) दौऱ्यात बुलेट ट्रेनबाबत (Bullet Train) मोठी घोषणा केली आहे. देशातील पहिली बुलेट ट्रेन (First Bullet Train In Country) 2026 मध्ये धावणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. सध्या त्याचे ट्रॅक 92 खांब तयार करण्यात आले आहेत. जागतिक दर्जाचे रेल्वे स्टेशन (Railway Station) बांधण्यात येणार आहे. याशिवाय 199 स्टेशन्स जागतिक दर्जाची करण्यासाठी मास्टर प्लॅन सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. याअंतर्गत अहमदाबाद रेल्वे स्टेशन जागतिक दर्जाचे (World Class Railway Station) बनवण्यात येणार आहे.
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, देशातील सर्व रेल्वे ट्रॅक अजूनही जमिनीवर आहेत. त्यामुळे जनावरांचा प्रश्न कायम आहे. तथापि, अशा समस्यांचा सामना करण्यासाठी रेल्वे तयार केल्या जात आहेत.
दरम्यान, कोरोनाच्या (Corona) संकटातून आता भारतीय रेल्वे (Indian Railways) पुन्हा रुळावर येत आहे. रेल्वेच्या फेऱ्या नियमित सुरू आहेत. मालवाहतूकही नेहमीप्रमाणे सुरू झाली आहे. त्याचा परिणाम म्हणून रेल्वेच्या उत्पन्नातही (Income) वाढ होत आहे. रेल्वेचा एकूण महसूल ऑगस्ट 2022 अखेर 38 टक्क्यांनी वाढून 95 हजार 486.58 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. हा आकडा गेल्या वर्षीच्या याच कालावधीत 26 हजार 271.29 कोटी रुपये होता. रविवारी अधिकृत निवेदनात ही माहिती देण्यात आली. प्रवासी वाहतुकीतून (Transport) मिळालेला महसूल समीक्षाधीन कालावधीत 25 हजार 276.54 कोटी होता, जो वर्षभराच्या तुलनेत 116 टक्के वाढ दर्शवितो, असे निवेदनात म्हटले आहे. एका वर्षापूर्वी हा आकडा 13 हजार 574.44 कोटी रुपये होता.
- Must Read : Indian Railway : रेल्वेला आले अच्छे दिन.. फक्त एकाच महिन्यात कमावले ‘इतके’ कोटी..
- Indian Railways: रेल्वेमंत्र्यांनी केली मोठी घोषणा ; प्रवासी खूश, म्हणाले तुम्ही..
- Railway : रेल्वेतील रोजगाराबाबत सरकारने दिली महत्वाची माहिती.. पहा, काय म्हणाले रेल्वेमंत्री ?