Indian Railways: तुम्ही कधी ट्रेनमध्ये (Indian Railways) प्रवास केला (Phone Battery drain fast in Train) असेल तर तुमच्या लक्षात आले असेल की प्रवास करताना तुमच्या फोनची बॅटरी वेगाने संपते. पण असे का होते याचे अचूक उत्तर आपल्याला माहिती नसते. असं काय होतं की ज्यामुळे आपल्या फोनची बॅटरी वेगाने डिस्चार्ज होते. फोनची बॅटरी संपुष्टात आली तर आपलंही टेन्शन वाढतंच. विशेषत: कुठे बाहेर जावं लागलं आणि बॅटरी कमी झाली तर आता सगळी कामं बंद पडतील असं वाटतं.
बॅटरी हा कोणत्याही फोनचा अत्यावश्यक भाग आहे असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. फोनची बॅटरी संपली म्हणजे फोनच बंद. फोन ही आजकाल आपल्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट बनली आहे. आता छोट्या-छोट्या कामांसाठीही फोन वापरावा लागतो. जेवणाची ऑर्डर देणे असो, कुठेतरी जाण्यासाठी कॅब बुक करणे असो किंवा लोकेशन पाहणे असो प्रत्येक गोष्टीसाठी फोन आवश्यक असतो.
फोन वापरताना कोणतीही अडचण येऊ नये त्यामुळे त्याच्या बॅटरीची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. जेणेकरून तो वापरताना कोणतीही अडचण येऊ नये. आपल्यापैकी बहुतेकांनी ट्रेनने प्रवास केला असेल आणि जर तुमच्याकडे असेल तर तुमच्या लक्षात आले असेल की ट्रेनमध्ये फोनची बॅटरी खूप लवकर कमी होते. असे का घडते याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? नसल्यास असे का घडते त्याची माहिती घेऊ या. असे घडण्याचे पहिले कारण म्हणजे नेटवर्क सर्च. जेव्हा आपण दुसऱ्या भागात जातो तेव्हा आपल्या फोनचा नेटवर्क झोन बदलतो.
तुम्ही बसने किंवा ट्रेनने प्रवास करत असलात तरी लांबच्या प्रवासात क्षेत्रे सतत बदलत राहतात. जेव्हा झोन सतत बदलतो आणि त्यामुळे फोन नेटवर्क सतत बदलत असते. नेटवर्क सर्चमुळे फोनची बॅटरी लवकर संपते. जीपीएस (GPS) हे बॅटरी संपण्याचे आणखी एक कारण आहे. हे दुसरे कारण देखील नेटवर्कशी जोडलेले आहे. फोनवर काहीही शोधण्यासाठी इंटरनेट आवश्यक आहे. तुम्ही तुमच्या फोनवर इंटरनेट वापरत राहिल्यास फोनची बॅटरी लवकर संपते. नेटवर्क झोननुसार बदलते आणि नंतर इंटरनेट डेटाच्या वापरासह बॅटरी लवकर संपुष्टात येते. तसेच प्रवास करताना जीपीएस वापरल्यास बॅटरी लवकर संपते.